Anant Ambani and Radhika Marchant Wedding: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अनंत त्याची बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंटबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. गेल्यावर्षीच दोघांचा साखरपुडा पार पडला. या साखपुड्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता लवकरच दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

दरम्यान, मुकेश अंबानी यांचे गुजरातमधील मूळ गाव जामनगर येथे अनंत व राधिकाच्या प्री वेडिगं (विवाहपूर्व कार्यक्रमां)ना सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाची पत्रिका समोर आली होती. १ मार्च २०२४ ते ३ मार्च २०२४ असे जवळपास तीन दिवस हे कार्यक्रम चालणार आहेत. या कार्यक्रमात जगभरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी होणार आहेत. सलमान खान, जान्हवी कपूर यांसारखे बॉलीवूडमधील अनेक कलाकार या प्री वेडिंग कार्यक्रमासाठी जामनगरमध्ये दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अंबानी कुटुंबाकडून जामनगरमध्ये जय्यत तयारीही करण्यात आली आहे.

हेही वाचा- “आकाश अंबानी माझा राम, ईशा अंबानी ही..”, अनंत अंबानींचं भावंडांसह नात्यावर स्पष्ट उत्तर, म्हणाले, “आमचे मतभेद..”

काल (२८ फेब्रुवारी) अंबानी कुटुंबाकडून जामनगरमध्ये अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला. परंतु अनंत व राधिकाचा प्री वेडिंग कार्यक्रमाचे आयोजन जामनगरमध्ये का करण्यात आले आहे असा प्रश्न अनेकांना पडला. दरम्यान नुकत्याच एका मुलाखतीत अनंत अंबानीने जामनगरमध्ये प्री वेडिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागच्या कारणांचा खुलासा केला आहे.

अनंत म्हणाला, जामनगरबरोबर माझ्या कुटुंबाचे जवळचे नाते आहे. माझ्या आजीचा जन्म इथेच झाला. माझ्या आजोबांनीसुद्धा इथूनच व्यापाराला सुरुवात केली. माझ्या वडिलांनी जामनगरमध्येच आजोबांबरोबर काम केले आहे. मी जामनगरमध्ये लहानाचा मोठा झालो. म्हणून जामनगरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले.

हेही वाचा- हाडे गोठवणाऱ्या थंडीत जोडप्याने केलं लग्न! स्पिती व्हॅलीतील Destination Wedding व्हिडीओ बघाच

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला सलमान खान, जान्हवी कपूर, मानुषी छिल्लर, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बडे स्टार्स उपस्थित राहणार आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय गायिका रिहानाची टीमही जामनगरला पोहोचली आहे. या प्री-वेडिंगमध्ये फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, वॉल्ट डिस्नेचे सीईओ बॉब इगर यांसारखे उद्योगपतीही उपस्थित राहणार आहेत.