‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमातील एका भागामधील एका पात्रावरून आगरी समाजाच्या भावना दुखवल्यामुळे झी मराठीने माफी मागितली आहे. झी मराठीने त्यांच्या ऑफिशियल फेसबुक पेजवरून आगरी समाजाची माफी मागितलीय. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचं स्पष्टीकरण झी मराठीनं दिलं.

५ आणि ६ नोव्हेंबर रोजी प्रसारित झालेल्या या कार्यक्रमाच्या भागात आगरी पात्र दाखवण्यात आलं होतं. आगरी पात्र चुकीच्या पद्धतीने रंगवल्याने आपल्या समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप केला होता. या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना लेखी पत्र लिहून त्यांनी ही तक्रार केली आहे. आगरी समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी येत्या सात दिवसांत कार्यक्रमात जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल अशा इशारा या पत्रातून देण्यात आला होता.

भाऊ कदम यांनी आगरी व्यक्तिरेखा साकारली होती. त्यामुळे भाऊ कदम यांनी माफी मागितली आहे. या व्यक्तीरेखेमुळे आगरी आणि कोळी समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे या समाजातील विविध संघटनांनी  भाऊ कदम यांची भेट घेत ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिली.