20 November 2017

News Flash

दोन स्वतंत्र छाप्यामध्ये सात तरुणींची सुटका

बुधवारी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी निवासस्थानांवर स्वतंत्र छापे घालून वेश्याव्यवसाय करण्यासाठी भाग पाडणाऱ्या लोकांना

प्रतिनिधी, मुंबई | Updated: November 8, 2012 3:42 AM

बुधवारी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी निवासस्थानांवर स्वतंत्र छापे घालून वेश्याव्यवसाय करण्यासाठी भाग पाडणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले आणि सात तरुणींची सुटका केली.
अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कुलाबा येथील उच्चभ्रू वस्तीतील एका निवासस्थानावर रात्री उशिरा छापा घातला. तेथे वेश्याव्यवसाय केला जात होता अशी माहिती मिळाली होती. छाप्यामधून चार तरुणींची सुटका करण्यात आली. तर रात्री साडेआठच्या दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांनी वाकोला परिसरातील दत्त मंदिर, डायमंड पार्क येथील निवासस्थानी छापा घालून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणारी एक महिला, एक दलाल यांना अटक केली. यातून २० ते २५ वयोगटातील तरुणींची सुटका करण्यात आली.

First Published on November 8, 2012 3:42 am

Web Title: 7 girls release in mumbai