News Flash

वसई पूर्वेतील दिवाण मार्केटला भीषण आग

दुकानदारांचे लाखोंच्या मालाचे नुकसान

संग्रहीत

वसई पूर्वेतील वसंतनगरी येथील दिवाण मार्केटला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आज (बुधवार) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत मार्केट मधील दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वसई पूर्वेतील वसंत नगरी परिसरात दिवाण मार्केट आहे. या दिवाण मार्केटमध्ये मासळी विक्रेते, भाजीपाला विक्रेते , कपडे व इतर विविध प्रकारच्या वस्तूंची दुकाने आहेत. दरम्यान रात्री  साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक या मार्केटला आग लागल्याने खळबळ उडाली. या घटनेची नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानुसार अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू झाले.

शॉर्टसर्किटने ही आग लागली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या आगीत दुकानदारांचे लाखोंच्या मालाचे नुकसान झाले आहे. आगीची तीव्रता अधिक असल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 9:20 pm

Web Title: a huge fire broke out at diwan market in vasai east msr 87
Next Stories
1 “हमाम में सब नंगे होते है”, सचिन वाझे प्रकरणात फडणवीसांच्या आरोपांवर संजय राऊतांचा पलटवार!
2 “सचिन वाझे, परमबीर सिंग ही तर प्यादी, खरे सूत्रधार सरकारमध्येच”, फडणवीसांचा थेट सरकारवर निशाणा!
3 मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच हेमंत नगराळेंनी घेतली पत्रकारपरिषद, म्हणाले…
Just Now!
X