20 November 2017

News Flash

बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा – उद्धव ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असून दवा आणि दुवा दोन्हीही काम करत

मुंबई | Updated: November 16, 2012 12:11 PM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असून दवा आणि दुवा दोन्हीही काम करत आहेत. आपला देव संकटातून नक्कीच बाहेर येईल, असा विश्‍वास शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल (गुरूवार) रात्री व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांनी रात्री ११ वाजता रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस या सर्व कुटुंबीयांसह ‘मातोश्री’बाहेर जमलेल्या शिवसैनिकांची भेट घेतली आणि बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिली.
गेल्या दोन दिवसांपासून तुम्ही सर्वजण तहानभूक विसरून बाळासाहेबांसाठी प्रार्थना करत आहात, त्यामुळेच शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे, असं उध्दव ठाकरे म्हणाले. त्यांचा रक्तदाब सामान्य पातळीवर असून ते वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. शिवसैनिकांनी शांतता व संयम बाळगण्याची विनंती उद्धव ठाकरे यांनी केली.

First Published on November 16, 2012 12:11 pm

Web Title: bal thackerays health remains stable uddhav