News Flash

मुंबईत भाषा भवन बांधण्यास मान्यता

मुंबईत भाषा भवन उभारण्याच्या निर्णयास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

| July 10, 2013 08:25 am

मुंबईत भाषा भवन उभारण्याच्या निर्णयास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. धोबी तलाव परिसरातील रंगभवन येथील खुल्या नाट्यगृहाच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या या इमारतीत मराठी भाषा भवन, सांस्कृतिक कार्य संचालनालय, भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळांची कार्यालये असणार आहेत. एक सुसज्ज ग्रंथालयही भवनामध्ये असेल. याशिवाय सिंधी, उर्दू, गुजराती अकादमीची कार्यालये देखील या भाषा भवनामध्ये असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2013 8:25 am

Web Title: bhasha bhavan in mumbai
Next Stories
1 कृपाशंकरसिंह यांच्याविरोधातील जनहित याचिका फेटाळली
2 व्हिडिओ ब्लॉग : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दूरगामी परिणाम करणारा
3 ‘काँग्रेसकडूनच दलितांवर सर्वाधिक अत्याचार’
Just Now!
X