24 November 2017

News Flash

भाजप प्रदेशाध्यक्ष १६ फेब्रुवारीला ठरणार

भाजप प्रदेशाध्यक्ष पदाबाबत १६ फेब्रुवारीनंतर निर्णय होण्याची शक्यता आहे. सुधीर मुनगंटीवार यांची फेरनिवड होणार

विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: February 13, 2013 5:48 AM

भाजप प्रदेशाध्यक्ष पदाबाबत १६ फेब्रुवारीनंतर निर्णय होण्याची शक्यता आहे. सुधीर मुनगंटीवार यांची फेरनिवड होणार की देवेंद्र फडणवीस किंवा अन्य नावावर शिक्कामोर्तब होणार, याविषयी उत्सुकता आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष पदी आक्रमक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला समर्थपणे तोंड देईल व सर्वाना बरोबर घेऊन जाईल, असा प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार आहे. पक्षाच्या कोअर समितीची बैठक पार पडली असली तरी त्यात कोणताच निर्णय झालेला नाही. आगामी निवडणुकीसाठी सर्वाधिकार दिलेले ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे व माजी केंद्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत १६ फेब्रुवारीला औरंगाबादला कोअर समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यावेळी प्रदेशाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

First Published on February 13, 2013 5:48 am

Web Title: bjp state chief to be chosen on 16 february
टॅग Bjp