शासनाकडून अधिसूचना जारी
कुख्यात गुंड छोटा राजन याला मुंबई पोलिसांच्या हवाली केली जाण्याची दाट शक्यता असल्यामुळे आर्थर रोड येथील मध्यवर्ती तुरुंगात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. गृहखात्याने खास अधिसूचना काढून मुंबई पोलिसांसाठी आर्थर रोड तुरुंगातील स्वतंत्र जागा एक रुपया वार्षिक भुईभाडे या नाममात्र दराने उपलब्ध करून दिली आहे. ठरावीक काळानंतर ही जागा पुन्हा तुरुंग प्रशासनाच्या हवाली केली जाणार आहे.
आर्थर तुरुंगातील तळमजल्यावरील विशिष्ट जागेचा तुरुंग म्हणून असलेला उल्लेख काही काळाकरिता रद्द करण्यात आला असून ही जागा मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. ही जागा राजनच्या चौकशीसाठी वापरली जाणार आहे.