News Flash

सुवर्णमहोत्सवी ‘ललित’ला गप्पांची सय..

‘ग्रंथप्रेमी मंडळाच्या सहाकार्याने ग्रंथलेखन, ग्रंथप्रसार आणि ग्रंथसंग्रह या विषयांना वाहिलेले मासिक’ असे ब्रीद असलेल्या आणि गेली पन्नास र्वष अव्याहतपणे चालू असलेल्या ‘ललित’ मासिकाचा सुवर्णमहोत्सवी सोहळा

| April 21, 2013 03:24 am

‘ग्रंथप्रेमी मंडळाच्या सहाकार्याने ग्रंथलेखन, ग्रंथप्रसार आणि ग्रंथसंग्रह या विषयांना वाहिलेले मासिक’ असे ब्रीद असलेल्या आणि गेली पन्नास र्वष अव्याहतपणे चालू असलेल्या ‘ललित’ मासिकाचा सुवर्णमहोत्सवी सोहळा आज मुंबईत साजरा होईल.
या सोहळ्याला जयवंत दळवी, रमेश मंत्री, ज्ञानेश्वर नाडकर्णी, रवींद्र पिंगे, सुभाष भेंडे, पंढरीनाथ रेगे, उमाकांत ठोंबरे, बाळ सामंत, केशवराव कोठावळे हे ‘ललित’च्या ग्रंथप्रेमी मंडळाचे दिवंगत सदस्यहजर नसतील. पण त्यापैकी असलेले वसंत सरवटे, मधु मंगेश कर्णिक उपस्थित राहतील. विजया राजाध्यक्ष आणि अरुण टिकेकर ‘ललित’विषयी बोलतील. वसंत सरवटे यांची ‘ललित’मधील चित्रे व मुखपृष्ठे यांचे संचितही प्रदर्शनरूपाने मांडले जाईल. मराठी लेखकांना हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून सुरू झालेल्या पण जयवंत दळवींच्या ‘ठणठणपाळ’ने रुजलेल्या ‘ललित’सारखं ‘बुक ट्रेड जर्नल’ प्रदीर्घ वाटचाल करतं, ही तशी कौतुकाचीच बाब आहे. पण या कौतुकाला लतिलच्या खऱ्या वैभव काळाचे शिल्पकार आणि साक्षीदार कमी संख्येने आहेत, ही काहीशी गडद किनार.
या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने ‘ललित’चे जानेवारी महिन्यापासून वाचनसंस्कृती, कविता, ललितगद्य, समीक्षा, वाङ्मयीन नियतकालिके, चरित्रे-आत्मचरित्रे, कथा, दृष्यकला, नाटक आणि कादंबरी या विषयांवर विशेषांक प्रकाशित होत आहेत.
रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त साधारणपणे याच विषयावर प्रकाशित झाले होते.
उद्याच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याची रचना औपचारिक भाषणे कमीत कमी असतील आणि उपस्थितांना एकमेकांशी मोकळेपणी बोलता येईल, अशा पद्धतीने करण्यात आली आहे. या आधी ‘ललित’मध्ये प्रकाशित झालेल्या सदरांची ‘निवडक ठणठणपाळ’, ‘आणखी ठणठणपाळ’, ‘अलाणे आणि फलाणे’, ‘लेखकाचे घर’, ‘गंभीर आणि गमतीदार’, ‘पितळी दरवाजा’, ‘निवडक मानाचे पान’ ही पुस्तके यापूर्वी प्रकाशित झाली आहेत. उद्या ‘टप्पू सुलतानी’, ‘आनंदीआनंद’, ‘सुहृदगान’, ‘निर्मितीरंग’ आणि ‘साहित्यिक गप्पा दहा साहित्यिकांशी’ अशा ‘ललित’मधील पाच सदरांची पुस्तके प्रकाशित होणार आहेत. हा सोहळा प्रभादेवीच्या कोहिनूर हॉलमध्ये संध्याकाळी सहा वाजता होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2013 3:24 am

Web Title: golden jubilee of lalit celebrations
टॅग : Celebration
Next Stories
1 दिली तर ‘टाळी’, नाही तर ‘अळीमिळी’!
2 तज्ज्ञ डॉक्टर मंत्रालयातील प्रशासकीय कामाच्या दावणीला?
3 शीळ दुर्घटना : आरोपींना पोलीस कोठडी
Just Now!
X