श्रावणातील घननिळा जसा बरसू लागतो तशी मनात श्रावणगीते रुंजी घालू लागतात. झाडाझाडांच्या फाद्यांना बांधलेले झोके उंच झुलू लागतात. श्रावणात नववधूंना वेध लागतात ते मंगळागौरीचे.  घरातील चार भिंतींमध्ये समरसून मंगळागौरीचे खेळ खेळणाऱ्या या मिळून साऱ्याजणींना स्पर्धेसाठी एकत्र आणत ‘झी २४ तास’ आणि ‘झी मराठी’ने ‘चला खेळू या मंगळागौर’चा नवा खेळ मांडला आहे.
‘झी २४ तास’ आणि ‘झी मराठी’च्या वतीने दरवर्षीप्रमाणे ‘चला खेळू या मंगळागौर’ या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ‘लोकसत्ता’ हे या स्पर्धेचे मुद्रितमाध्यम प्रायोजक आहेत. राज्यात विविध ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची सुरुवात १९ ऑगस्टला डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटय़गृहात सायंकाळी ४.३० वाजता होईल. त्यानंतर २० ऑगस्टला ठाण्यात गडकरी रंगायतन, २४ ऑगस्टला नाशिकमध्ये कालिदास नाटय़गृह, २७ ऑगस्टला साताऱ्यात एसडीडीसी हॉल, २८ ऑगस्टला सांगलीत विष्णुदास भावे सभागृह, ३० ऑगस्टला सोलापूरमध्ये हुतात्मा रंगमंदिर आणि ३१ ऑगस्टला पुण्यात टिळक स्मारक येथे ही स्पर्धा होईल. या प्रत्येक ठिकाणी सायंकाळी ४.३० वाजता ही स्पर्धा रंगणार आहे. प्रत्येक ठिकाणच्या स्पर्धेतून एक विजेता निवडला जाईल आणि त्यानंतर निवडलेल्या सात विजेत्यांमध्ये अंतिम फेरीसाठी पुन्हा खेळ रंगेल.
या स्पर्धेची अंतिम फेरी ४ सप्टेंबरला माटुंग्याच्या यशवंत नाटय़मंदिरात रंगणार आहे. रामबंधु टेम्प्टीन प्रस्तुत, पनवलेकर ग्रुप, अभ्युदय बँक, मांडके हिअरिंग सव्र्हिस आणि मंगलाष्टक डॉट कॉम यांनी सहप्रायोजित केले आहे. या स्पर्धेत परीक्षक म्हणून अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी, मेधा भागवत यांच्यासारखे सेलिब्रिटी कलाकार काम पाहणार असून अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री तन्वी पालव हे दोघेही या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
*  प्रक्षेपण- १ ते १० सप्टेंबपर्यंत ‘झी २४ तास’वर सायंकाळी ५.३० वाजता.
* संपर्क- ०२२-२४८२७७९३