मुंबई : ‘महानगर टेलिफोन निगम लिमिटेड’चे (एमटीएनएल) मुंबई व दिल्लीतील कर्मचारी गेले दोन महिने वेतनापासून वंचित आहेत. पुढील आठवडय़ात दिवाळी  असतानाही  ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे वेतन कधी मिळणार, याबाबत व्यवस्थापनाकडून काहीही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे कर्मचारी अस्वस्थ झाले असून आंदोलनाचे हत्यार उपसण्याच्या तयारीत आहेत.

‘बीएसएनएल’पाठोपाठ एमटीएनएल कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी दूरसंचार विभागाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र त्याच वेळी या कर्मचाऱ्यांच्या दोन महिन्यांच्या प्रलंबित वेतनाबाबत दूरसंचार विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे स्वेच्छानिवृत्ती योजना जारी झाली तरी वेतनाचे काय होणार, असा सवाल हे कर्मचारी विचारत आहेत.

interim result of the fifth and eighth scholarship examination has been announced
पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर
10 percent reduction in employees from Ola print
‘ओला’कडून पुन्हा १० टक्के नोकरकपात; मुख्याधिकारी चार महिन्यांतच पायउतार
rbi ban on online customer registration and credit card distribution to kotak mahindra
कोटक महिंद्र बँकेवर निर्बंध; ऑनलाईन ग्राहक नोंदणी व क्रेडिट कार्ड वितरणावर रिझर्व्ह बँकेची बंदी
mumbai high court,
दाऊदी बोहरा उत्तराधिकारी वादावर उच्च न्यायालय आज निर्णय देणार, प्रदीर्घ सुनावणीनंतर गेल्या वर्षी निर्णय राखून ठेवला होता

टेलिफोन निगममधील मान्यताप्राप्त युनियन असलेल्या कर्मचारी संघाकडेही या कर्मचाऱ्यांनी विचारणा केली असता वेतन लवकरच होईल, असे सांगितले जात आहे. दिवाळीला  आठवडा उरलेला असताना वेतन न झाल्याने यंदाची दिवाळी अंधारातच जाणार का, असा  सवालही ते विचारीत आहेत. या विरोधात युनायटेड फोरमचे समन्वयक अरुणकुमार कौशिक यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी प्रभादेवी येथील टेलिफोन हाऊस येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. व्यवस्थापनाला जाब विचारला जाणार आहे. त्यानंतरही समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निमंत्रक एम. एम. सावंत यांनी सांगितले.