22 January 2018

News Flash

समलिंगी संबंधाची मागणी केल्याने मित्राची भोसकून हत्या

नाताळची पार्टी साजरी करायला आलेल्या मित्राने समलिंगी संबंधासाठी जबरदस्ती केल्याने संतापलेल्या मित्राने त्याची हत्या केली. दहिसरच्या नवागाव येथे सोमवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

प्रतिनिधी मुंबई | Updated: December 26, 2012 5:05 AM

नाताळची पार्टी साजरी करायला आलेल्या मित्राने समलिंगी संबंधासाठी जबरदस्ती केल्याने संतापलेल्या मित्राने त्याची हत्या केली. दहिसरच्या नवागाव येथे सोमवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी मित्राला अटक केली आहे.
बोरिवलीच्या आयसी कॉलनी येथे राहणाऱ्या रायन कॅशियानो गोम्स (२१) याच्या वडिलांच्या नावे दहिसरच्या नवागाव येथील जयशंकर इमारतीत एक घर आहे. सोमवारी नाताळच्या आदल्या दिवशी त्याने दहिसरमध्ये राहणारा मित्र अ‍ॅलेक्स डिसोजा (२१) याला पार्टीसाठी बोलावले होते. सकाळी साडेसहाच्या सुमारास तो रायनच्या घरी पोहोचला. थोडा वेळ दोघांनी गप्पागोष्टी केल्यानंतर रायनने अ‍ॅलेक्सच्या शरीराशी अश्लील चाळे करत शरीरसंबंधाची मागणी केली. या अनपेक्षित प्रकाराने संतापलेल्या अ‍ॅलेक्सने त्याला विरोध केला. परंतु रायनने जबरदस्ती केल्याने अ‍ॅलेक्सने त्याची चाकू भोसकून हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने रायनच्या वडिलांना फोन करून अज्ञात व्यक्तीने रायनवर हल्ला केल्याचे सांगितल़े़ रायनच्या वडिलांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन रायनला भगवती रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आल़े
पोलिसांनी संशयावरून अ‍ॅलेक्सला ताब्यात घेतले होते. सुरुवातीला त्याने आपला काहीही संबंध नाही, असा पवित्रा घेतला. मात्र मंगळवारी दुपारी त्याने हत्येची कबुली दिली. आरोपी अ‍ॅलेक्स याला २८ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत माहिती देतांना एमएचबी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश खिलजे यांनी सांगितले की, समिलगी संबंधामुळे हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र आम्ही इतर सर्व दुवेही तपासत आहोत.
बोरिवलीच्या आयसी कॉलनीत राहणारा रायन गोम्स सेंट झेवियर्स महाविद्यालयातून बीएड, तर आरोपी अ‍ॅलेक्स डिसोजा हा मालाडच्या विद्याविकास युनिव्हर्सिटी महाविद्यालयातून बीएमएम (बॅचलर्स इन मास मिडीया) करीत होता. दोघे चांगले मित्र होते. या घरी ते आठवडय़ातून एकदा येत असत, अशी माहिती नवापुरच्या जयशंकर नगरमधील शेजाऱ्यांनी दिली.

First Published on December 26, 2012 5:05 am

Web Title: mudered of friend because of he demanded for relationship
टॅग Crime,Friend,Murdered
  1. No Comments.