News Flash

मल्टिप्लेक्स आता आपल्या दारी!

मराठी चित्रपट आणि मल्टिप्लेक्स यांच्यातील वाद नेहमीचाच झाल्यामुळे मराठी निर्मात्यांची डोकेदुखी वाढली आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारही याबाबत कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहे.

| June 2, 2013 02:58 am

मराठी चित्रपट आणि मल्टिप्लेक्स यांच्यातील वाद नेहमीचाच झाल्यामुळे मराठी निर्मात्यांची डोकेदुखी वाढली आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारही याबाबत कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहे. अशा वेळी मराठी चित्रपटांना हक्काचे ‘मल्टिप्लेक्स’ मिळवून देण्यासाठी शिवसेना चित्रपट सेनेने पुढाकार घेत ‘मल्टिप्लेक्स तुमच्या दारी’ ही नवी योजना आखली आहे. याबाबत चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी खास ‘लोकसत्ता’शी बोलताना ही माहिती दिली.
मल्टिप्लेक्सची समस्या मराठी चित्रपटांच्या पाचवीलाच पुजली आहे. मराठी चित्रपटाच्या बरोबरीने एखादा बडय़ा बॅनरचा िहदी चित्रपट प्रदíशत होणार असेल, तर हमखास मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्स प्रवेश डावलला जातो. अनेक आंदोलने करून, निवेदने देऊनही या परिस्थितीत काहीच सुधारणा झालेली नाही. वारंवार सरकार दरबारी आपल्या चित्रपटांसाठी भीक मागायचाही कंटाळा आला आहे. त्यामुळे आता आम्हीच यावर मार्ग काढण्याचे ठरवले आहे, असे बांदेकर यांनी सांगितले.
‘मल्टिप्लेक्स तुमच्या दारी’ या योजनेद्वारे शिवसेना चित्रपट सेना मल्टिप्लेक्ससारख्या सुविधा असलेले एक ‘चित्रपटगृह’ थेट प्रेक्षकांपर्यंत घेऊन जाणार आहे. या ‘चित्रपटगृहात’ सोफ्यापासून खुच्र्यापर्यंत आसनव्यवस्था असेल. या चित्रपटगृहात ८०० च्या आसपास आसनव्यवस्था असणार आहेत. शिवाय ७० एमएमचा विशाल पडद्यावर मराठी प्रेक्षकांना चित्रपटाचा आनंद लुटता येणार आहे. ‘चित्रपटगृह’ संपूर्ण वातानुकूलित असेल.
या ‘चित्रपटगृहा’त फक्त मराठी चित्रपट दाखवले जातील. मल्टिप्लेक्समध्ये एकूण तिकीट विक्रीच्या ३५ टक्के पसे निर्मात्याला मिळतात. मल्टिप्लेक्सपेक्षा जास्त वाटा निर्मात्यांना मिळेल. प्रेक्षकांना कमी दरात दोन चित्रपट पाहता येणार आहेत. यात नव्याने प्रदíशत झालेला एक चित्रपट आणि मराठी चित्रपटसृष्टीचे गतवैभव असलेला एखादा चित्रपट दाखवण्याची योजना असल्याचे बांदेकर यांनी स्पष्ट केले.
सध्या चाचणी स्वरूपात सुरू होणारे हे ‘चित्रपटगृह’ मुंबईतील काही उपनगरे, ठाणे, डोंबिवली या पट्टय़ात प्रेक्षकांच्या दारी जाणार आहे. या ‘चित्रपटगृहा’चे उद्घाटन शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या सुमारास होण्याची शक्यता आहे.तसेच २२ जूनच्या आसपास हे चित्रपट गृह सुरू करण्याचा  प्रयत्न असणार आहे, असे बांदेकर यांनी स्पष्ट केले.
या ‘चित्रपटगृहात’ सोफ्यापासून खुच्र्यापर्यंत अशी ८०० च्या आसपास आसनव्यवस्था असेल.  शिवाय ७० एमएमचा विशाल पडद्यावर मराठी प्रेक्षकांना चित्रपटाचा आनंद लुटता येणार आहे. ‘चित्रपटगृह’ संपूर्ण वातानुकूलित असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2013 2:58 am

Web Title: multiplex cinema at your doorstep
Next Stories
1 श्रेय घ्या, पण रेसकोर्सवर उद्यान बनवा!
2 पेंटोग्राफ तुटून लोकल खोळंबल्या
3 जुन्या घटनादुरुस्तीला अद्याप मान्यता नाही
Just Now!
X