राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची मागणी
ताज महालबाबत सुरू असलेला वाद थांबण्याची चिन्हे दिसत नसून भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर आता राष्ट्रवादी कॉँगेसने या वादात भाग घेतला आहे. ताज महालच्या वादाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी गुरुवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमधून लोकांना चुकीचे उपदेश केले जातात. याच लोकांना नंतर भाजपमध्ये समाविष्ट केले जाते. जर या लोकांची वक्तव्यांमध्ये तथ्य असेल तर पंतप्रधानांनी जाहीरपणे ते सत्य असल्याचे सांगावे असे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. पण ते चुकीची माहिती देत असल्यास त्यांच्या विरोधात कठोर कार्यवाही करावी असे त्यांनी सांगितले. १७ व्या शतकात तयार करण्यात आलेल्या जगप्रसिद्ध ताज महाल या स्मारकाबाबत वाद सुरू झाला आहे. हा वाद वाढती महागाई, बेरोजगारी, बिघडलेली अर्थव्यवस्था या प्रश्नांपासून लोकांचे लक्ष वळविण्यासाठी उठवला जात असल्याचा दावा मलिक यांनी केला. उत्तर प्रदेशमधील भाजपचे आमदार संगीत सोम यांनी नुकतेच ताज महालला भारतीय परंपरेत स्थान आहे का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत वादग्रस्त विधान केले होते. तर भाजपचे वरिष्ठ नेते विनय कटियार यांनी बुधवारी ताज महाल मुळात तेजो महाल नावाचे भगवान शिवाचे मंदिर होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 20, 2017 1:16 am