News Flash

दक्षिण, मध्य मुंबईत बुधवारी पाणी नाही

महापालिकेने महालक्ष्मी रेसकोर्स येथे जलवाहिन्यांसंबंधी काम हाती घेतल्यामुळे बुधवार, ५ जून रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ६ जून रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत ग्रॅन्ट रोड, वरळी, दादर,

| June 2, 2013 02:48 am

महापालिकेने महालक्ष्मी रेसकोर्स येथे जलवाहिन्यांसंबंधी काम हाती घेतल्यामुळे बुधवार, ५ जून रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ६ जून रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत ग्रॅन्ट रोड, वरळी, दादर, प्रभादेवी, माटुंगा येथील काही विभागांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
महापालिकेने जलबोगदा प्रकल्पाअंतर्गत १२०० मिलीमीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) मुख्य जलवाहिनीला महालक्ष्मी रेसकोर्स येथे जलजोडणीचे व दोन झडप बसविण्याचे काम बुधवारी सकाळी ७ वाजता हाती घेण्यात येणार आहे. हे काम ६ जून रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज पालिकेकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून ६ जून रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत ताडदेव, तुळशीवाडी, नाना चौक, वरळी डेअरी, वरळी कोळीवाडा, सर पोचखानवाला मार्ग, वरळी बीडीडी चाळ, दादरमधील बीबीडी चाळ, कस्तुरबा रुग्णालय, नायर रुग्णालय, दुर्गादेवी टाकी, एम. पी. मिल कम्पाऊण्ड, दादर, प्रभादेवी, माटुंगा इत्यादी विभागांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आदल्या दिवशी पुरेशा पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2013 2:48 am

Web Title: no water in south central mumbai on wednesday
Next Stories
1 ‘महाराष्ट्र सदना’च्या वादग्रस्त इमारतीचे मंगळवारी उद्घाटन
2 ठाणे परिवहन बस घोटाळ्यात तेरा जणांना कारावास
3 कोळीवाडे-गावठाणांना स्वतंत्र नळजोडणी
Just Now!
X