04 March 2021

News Flash

माधुरीची ‘ऑनलाइन’ नृत्यशाळा

तिचे संकेतस्थळ तर होतेच, भारतात परतल्यानंतर तिने पहिल्यांदा फेसबुकवर चेहरा कायम केला. मग ट्विटरची ‘टिव टिव’ सुरू केली. त्याच्याही पुढे जाऊन मग आयटय़ून्स, आयपॅड आणि

| February 26, 2013 03:18 am

तिचे संकेतस्थळ तर होतेच, भारतात परतल्यानंतर तिने पहिल्यांदा फेसबुकवर चेहरा कायम केला. मग ट्विटरची ‘टिव टिव’ सुरू केली. त्याच्याही पुढे जाऊन मग आयटय़ून्स, आयपॅड आणि अँड्रॉइड अ‍ॅप्लिकेशन्स अशा वेगाने तंत्रज्ञानावर माधुरी दिक्षीत-नेने नावाची मोहोर उमटवणाऱ्या आपल्या माधुरीने सोमवारी पहिल्यावहिल्या ‘ऑनलाइन’ नृत्यशाळेचा शुभारंभ केला आहे. अर्थात, या ऑनलाइन नृत्य अकादमीची माहितीही माधुरीने चाहत्यांना ट्विटरवरूनच दिली आहे.
माधुरीच्या या ऑनलाइन नृत्यशाळेचा लाभ कोणालाही, कुठेही सहजपणे घेता येणार आहे. माधुरीकडून नृत्याचे धडे गिरवायचे असतील तर dancewithmadhuri.com या संकेतस्थळावर जायचे आणि तुमचे प्रोफाईल तयार करायचे. मग माधुरी स्वत: तुम्हाला नृत्य शिकवताना दिसणार आहे. या संकेतस्थळावर आपल्या योजनेची माहिती देताना, ‘माझ्या आयुष्यात तीन गोष्टींना महत्त्वाचे स्थान राहिले आहे, ते म्हणजे खाणे, कपडेलत्ते आणि नृत्य. आपल्या देशात अगदी जनेरटरच्या आवाजाच्या तालावरही नृत्य करणारे लोक आहेत. यातून मला एवढेच सांगायचे आहे की आपल्याकडे कोणालाही नृत्य करता येऊ शकते. आज या नृत्यकलेला तुमच्या आयुष्यात एक आनंदाची गोष्ट मला बनवायची आहे. मला इतकी वर्षे नृत्य करताना तुम्ही पाहिलेले आहे. आता तुम्हीही संके तस्थळावर माझ्याबरोबर या आणि नृत्यकलेचा आस्वाद घ्या. हे सारे जगच आपल्यासाठी नृत्याचा रंगमंच असेल, असे आवाहन तिने केले आहे.
या संकेतस्थळावर माधुरीने सध्या आपल्या दोन गाण्यांवरचे नृत्य उपलब्ध केले आहे. येत्या काही दिवसांत आपल्या गाण्यांचा संग्रह तर संकेतस्थळावर असेलच; पण वेगवेगळया नृत्यदिग्दर्शकांचे सादरीकरण, नृत्याच्या विविध शैलीही या संकेतस्थळावर अभ्यासता येणार असल्याची माहिती माधुरीने दिली आहे. या संकेतस्थळाच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या गतीने, तुमच्या सवडीने, तुमच्या हातात उपलब्ध असलेल्या मोबाईल, आयपॅड अशा कुठल्याही साधनांच्या माध्यमातून नृत्य शिकू शकता, जगभरातील लोकांशी संपर्क साधू शकता, असे आश्वासनही माधुरीने दिले आहे. एकंदरीतच आपल्या दुसऱ्या इनिंगसाठी भारतात परतलेल्या माधुरीने अभिनयापेक्षा उद्योजिका म्हणून जम बसवण्यावर भर दिला असल्याचे दिसते आहे. तिने स्वत:चे प्रॉडक्शन हाऊसही सुरू केले असून तिच्या बॅनरखाली निर्माण होणाऱ्या चित्रपटाचीही चाहते वाट बघत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2013 3:18 am

Web Title: online dance school of madhuri
टॅग : Online
Next Stories
1 ‘त्या’ वसाहतींचा पुनर्विकास करा न्यायालयाची सूचना
2 वांगणी होणार अपंगस्नेही रेल्वेस्थानक?
3 बिबटय़ाच्या अवयवांची परदेशात तस्करी
Just Now!
X