राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी आव्हान दिल्यामुळेच मी सात तारखेला पुण्यात येणार होतो. पुण्यामध्ये माझी कोणतीही नियोजित सभा नाही. मी पुण्यात येणार म्हटल्यावर काही जणांना आपण तिथे सभा घेणार असल्याचा गैरसमज झाल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मुंबईत दिली. 
मला कोणत्याही पक्षाविरुद्ध रस्त्यावर संघर्ष करायची इच्छा नाही, असे स्पष्ट करून राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसने आव्हान मागे घेतले, म्हणजे त्यांची हार झाली आणि हे साजरे केले पाहिजे, असे मला अजिबात वाटत नाही. केवळ त्यांनी आव्हान दिले म्हणूनच मी सात तारखेला पुण्यात येतो, असे म्हटले होते. यापुढेही राष्ट्रवादी कॉंग्रेसवर आपण टीका करीत राहणार आहोत.