राज्यभरातील टोल कंत्राटदारांच्या मांडवाखालून आतापर्यंत बरीच वाहने वाहून गेली आहेत आणि या कंत्राटदारांचे आणि त्यांच्या आश्रयदात्या राजकारण्यांचे उखळ पांढरे झाले आहे. किती पैसा नक्की जमा झाला या टोल कंत्राटातून?
राज्यांत टोल नक्की आहेत तरी किती? कोणी तयार केले हे टोलधार्जिणे धोरण? माहिती अधिकाराचे शस्त्र वापरून ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी मधु कांबळे यांनी सहा महिने राज्यभर अथक प्रयत्न केल़े  सार्वजनिक बांधकाम खात्याची कार्यालये धुंडाळली, जंगजंग पछाडले आणि त्यातून हाती आला स्फोटक ऐवज. अस्वस्थ करणारा. झोप उडविणारा. त्यावर आधारित वृत्तमालिका ‘टोलचे गौडबंगाल’ मंगळवारपासून.