News Flash

होंडा सिटीच्या धडकेत दोघांचा मृत्यू

भरधाव वेगाने जाणाऱ्या होंडा सिटी गाडीने दिलेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला. दादरच्या कॅटरिंग कॉलेजजवळ सोमवारी मध्यरात्री हा अपघात झाला. पोलिसांनी होंडा सिटीच्या चालकाला

| April 3, 2013 04:35 am

भरधाव वेगाने जाणाऱ्या होंडा सिटी गाडीने दिलेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला. दादरच्या कॅटरिंग कॉलेजजवळ सोमवारी मध्यरात्री हा अपघात झाला. पोलिसांनी होंडा सिटीच्या चालकाला अटक केली आहे.
मालाड येथे राहणारे आणि सिद्धिविनायक मंदिरात सेवेकरी म्हणून काम करणारे विनोद ख्वायेया (४५) आणि पंकज शाह (४५) हे दोघे सोमवारी रात्री मंदिरात निघाले होते. मध्यरात्री वांद्रय़ाच्या दिशेने जाणाऱ्या एका होंडा सिटी गाडीने या दोघांच्या पल्सर मोटारसायकलला धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर होंडा सिटीचा चालक जेस्सी मेंडोन्सा (२३) पळून गेला. स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिवाजी पार्क पोलिसांनी याप्रकरणी जेस्सी मेंडोन्सा याला खारदांडा येथून अटक केली.
जेस्सी हा डिजे असून तोही सिद्धिविनायक मंदिरातून आपल्या घरी परतत होता. त्याच्याकडे वाहन परवाना नव्हता. त्याला बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 4:35 am

Web Title: two died because of hit by honda city car
Next Stories
1 सुबोध आता ‘लोकमान्य’
2 मुंबई विद्यापीठाच्या हॉलतिकिटांचा घोळ सुरूच
3 शाहरूखविरोधात मनोज कुमार पुन्हा न्यायालयात
Just Now!
X