13 August 2020

News Flash

येत्या रविवारी पश्चिम रेल्वेवर हजारावा जम्बोब्लॉक

दोन दशकांपूर्वी जम्बोब्लॉकची सुरुवात झाली

संग्रहित छायाचित्र

पश्चिम रेल्वेकडून यंदाच्या रविवारी घेण्यात येणारा जम्बो ब्लॉक पश्चिम रेल्वेच्या इतिहासातील एक हजारावा जम्बोब्लॉक असणार आहे. दोन दशकांपूर्वी देखभालीच्या कामासाठी पश्चिम रेल्वेकडून जम्बोब्लॉक घेण्यात येऊ लागला. यंदाच्या रविवारी (९ एप्रिल) घेण्यात येणारा जम्बोब्लॉक पश्चिम रेल्वेचा एक हजारावा जम्बोब्लॉक असणार आहे.

रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर यांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी पश्चिव रेल्वेकडून जम्बोब्लॉक घेण्यात येतो. सोमवार ते शनिवार या कालावधीत तांत्रिक बिघाड आणि अपघात होऊ नयेत, यासाठी जम्बोब्लॉक घेतला जातो. मध्य रेल्वेवर जम्बोब्लॉकला मेगाब्लॉक म्हटले जाते. ‘येत्या रविवारी पश्चिम रेल्वेवर घेण्यात येणारा जम्बोब्लॉक पश्चिम रेल्वेच्या इतिहासातील एक हजारावा मेगाब्लॉक असणार आहे. मरीन लाईन्स आणि माहिम दरम्यान डाऊन मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या कालावधीत जम्बोब्लॉक घेतला जाणार आहे,’ अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जम्बोब्लॉक दरम्यान रेल्वेच्या अभियंत्यांकडून रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा यांची पाहणी करुन त्यांची दुरुस्ती केली जाते. ‘पश्चिम रेल्वेवर पहिला जम्बोब्लॉक २२ ऑक्टोबर १९९५ रोजी घेण्यात आला होता. बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गावर हा जम्बोब्लॉक घेण्यात आला होता,’ अशी माहिती पश्चिम पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

‘सुधारणांना प्राधान्य देण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी १९९४-९५ पासून पश्चिम रेल्वेवर दर रविवारी दुरुस्ती आणि देखभालीच्या कामाला सुरुवात झाली. देखभालीचे काम संपल्यावर त्याला जम्बोब्लॉक असे नाव देण्यात आले. यानंतर अनेकदा रविवारी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी जम्बोब्लॉक घेतला जाऊ लागला. या काळात लोकलच्या काही फेऱ्या रद्द केल्या जाऊ लागल्या, तर काही लोकल गाड्या इतर ट्रॅकवर वळवण्यात येऊ लागल्या,’ असे पश्चिम रेल्वेचे कर्मचाऱ्यांनी म्हटले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2017 5:06 pm

Web Title: western railway 1000th jumbo block on sunday
Next Stories
1 विधानसभेतील ‘त्या’ १० आमदारांचे निलंबन अखेर मागे
2 मंत्री असताना शिफारस कसली करताय?, एकनाथ खडसेंनी तावडेंना सुनावले
3 प्रभूंची माया अफाट, कोकण रेल्वे सुसाट!
Just Now!
X