माजी आयुक्त सोनवणे यांच्यासह चौघांची चौकशी
कल्याण महापालिका क्षेत्रातील चिकणघर येथील एका आरक्षित भूखंडावर अतिक्रमणे असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून बांधकाम व्यावसायिकास शंभर टक्के विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) देण्याच्या प्रकरणात सुमारे १२५ कोटींचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्यासह चार अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार या चारही अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती नगरविकास विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
कल्याण महापालिकेतील टीडीआर घोटाळ्याबाबत शिवसेनेचे अनिल परब यांनी विधिमंडळात आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केली होती. चिकणघर येथे आरक्षण क्रमांक १९२ ते १९७ या आरक्षित भूखंडावर अतिक्रमणे असतानाही ती हटविल्याचे भासवून याच आरक्षणावर ३ हजार १२५ चौरस मीटर क्षेत्रासाठी ‘टीडीआर’ देताना गरप्रकार झाल्याचे चौकशीत आढळून आले आहे. विकासकास प्रथम ८० टक्के टीडीआर देण्यात आला. मात्र त्यानंतर राजकीय दबावातून उर्वरित २० टक्केही टीडीआर बहाल करण्यात आला असून त्यात मोठय़ा प्रमाणात अनियमितता झाल्याचे सूत्रांनी सांगितले. एकंदरीत यात सुमारे १२५ कोटींचा घोटाळा झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून त्या प्रकरणी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे, तत्कालीन साहाय्यक संचालक सी. पी. सिंग, नगररचनाकार रघुवीर शेळके आणि कनिष्ठ अभियंता शशी केदार यांना जबाबदार धरण्यात आले असून त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या सर्व अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्यांचे म्हणणे आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. प्रसंगी फौजदारी कारवाईही केली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

shekhar charegaonkar fraud marathi news
राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, गुंतवणूकदारांची फसवणूक
High Court orders Municipal Corporation to remove illegal vendors from Hill Road
मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
BJP candidate Ramdas Tadas has two offices in the city without obeying the order of Amit Shah
अमित शहांचा आदेश पाण्यात, भाजप उमेदवाराची शहरात दोन कार्यालये
Pratibha Dhanorkar
प्रतिभा धानोरकरांनी ‘हातउसने’ घेतले ३९ कोटी! निवडणूक आयोगाला दिलेल्या संपत्ती विवरणातील तपशील