मुंबई: नवरात्रीचा गरबा, दीपोत्सव, छटपूजा झाल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी आता महालक्ष्मी व्रताच्या माध्यमातून मतदारसंपर्क सुरू केला आहे. सणांचे निमित्त साधून मतदारांना आपलेसे करण्यासाठी भाजपच्या एका माजी नगरसेवकाने अनोखी शक्कल लढवली आहे. मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचे साहित्य वाटप करण्याचे भाजपच्या एका माजी नगरसेवकाने ठरवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुढील आठवड्यापासून मार्गशीर्ष महिना सुरु होत असून १४ डिसेंबर रोजी पहिला गुरुवार आहे. मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करण्याची परंपरा अनेक घरात आहे. घाटकोपरमधील भाजपच्या नगरसेवकांनी नेमकी हीच संधी हेरून महालक्ष्मी व्रताचे साहित्य वाटप करण्याचे ठरवले आहे. आतापर्यन्त राजकीय पक्षातर्फे दिवाळीत उटणे, फराळ, साखर, रवा असे साहित्य वितरित करून आपल्या पक्षाचा व स्वतःचा प्रचार करण्याची संधी साधली जात होती. त्यात आता मार्गशीर्ष महिन्याच्या व्रताचाही समवेश होऊ लागला आहे.

हेही वाचा… पालिकेच्या विभाग कार्यालयात उंदीर आणि घुशी सोडणार; मनसेचा इशारा

घाटकोपर मधील माजी नगरसेवक, मुंबई भाजपचे सचिव प्रवीण छेडा यांनी ही शक्कल लढवली आहे. व्रतासाठी लागणारा महालक्ष्मीचा मुखवटा, पोशाख, हळद कुंकू, व्रताची पुस्तिका असे साहित्य वाटप केले जाणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A former bjp corporator has decided to distribute materials for the mahalakshmi fast in the month of margashirsha mumbai print news dvr
First published on: 06-12-2023 at 15:48 IST