मुंबई : मुंबईतील सर्वात जास्त लोकसंख्येचा व सर्वात जास्त घनतेचा विभाग असलेल्या मालाडमधील पी उत्तर विभागाच्या विभाजनाची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. या विभाजनानंतर नवीन कार्यालयासाठी १७ नवीन पदे निर्माण करावी लागणार आहेत.

पी पूर्व व पी पश्चिम असे दोन भाग होणार असून सध्याच्या पी उत्तर विभाग कार्यालयात पी पश्चिमचे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने विधि समितीच्या पटलावर सादर केला आहे.  पूर्वेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून ते पश्चिामेला अरबी समुद्र, उत्तरेला क्रांतीनगर आप्पा पाडा तर दक्षिणेला चिंचोली बंदपर्यंत पसरलेल्या पी उत्तर विभागाचे विभाजन करण्याचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे.  तब्बल १८ प्रभाग असलेल्या या भल्यामोठय़ा विभागाला सोयीसुविधा देताना पालिकेच्या यंत्रणेच्याही नाकीनऊ येत आहेत. नागरिकांनाही या विभाग कार्यालयापर्यंत येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

Crime against three officers including Superintendent of State Excise Department for taken bribe for beer shop license
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा; बिअर शॉपीच्या परवान्यासाठी घेतली एक लाखाची लाच
RBL Bank Fraud Case, 11 Including Senior Officers Booked, Rs 12 Crore Scam, rbl bank scam, rbl bank scam Rs 12 Crore , Senior Officers in RBL Bank scam, Mumbai news,
आरबीएल बँकेची १२ कोटींच्या फसवणूक केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांसह ११ जणांवर गुन्हा, बँकेच्या दक्षता विभागाची तक्रार
Kidnapping of officer in case of embezzlement in Kolhapur Zilla Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त
BJP manifesto does not mention job creation statehood for Kashmir
महागाई, एनआरसीबाबत भाजपचे मौन; रोजगारनिर्मिती, काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याचा जाहीरनाम्यात उल्लेख नाही

पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पात या विभागाचे विभाजन करण्याची घोषणा केली होती. मालाड पूर्वेला ‘पी पूर्व’ तर मालाड पश्चिमेला ‘पी पश्चिम’ असे दोन विभाग करण्याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे. तसेच त्याकरिता पाच कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. मात्र आर्थिक वर्ष संपत आले तरी त्याबाबत काहीच प्रगती होत नम्व्हती. आता सामान्य प्रशासन विभागाने या विभाग कार्यालयाच्या विभाजनासाठी प्रस्ताव तयार केला आहे.

पी उत्तर विभाग कार्यालय हे मालाड पश्चिमेला

असून पूर्वेला आप्पा पाडा, आंबेडकर नगर, क्रांतीनगर, संतोष नगर येथील रहिवाशांना पडणारा वळसा टाळण्यासाठी पी पूर्वचे नवीन कार्यालय सुरू होणार आहे. सध्याची पी उत्तरची  इमारत मोडकळीस आली असल्यामुळे ती पाडून नवीन इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. या इमारतीत पी पश्चिमचे कार्यालय सुरू होणार आहे. तर पी पूर्वच्या विभाग कार्यालयासाठी जागेचा शोध सुरू आहे. हे कार्यालय झाल्यास मालाड पूर्वमधील रहिवाशांचा वेळ वाचणार आहे.

पूर्व-पश्चिममधील विभाग

मालाड पी उत्तरमध्ये १८ प्रभाग आहेत. त्यात आठ प्रभाग हे पश्चिम परिसरातील, तर दहा प्रभाग हे पूर्व विभागातील आहेत. नव्या रचनेनुसार पी पश्चिममध्ये ३२, ३३, ३४, ३५, ४६, ४७, ४८, ४९ असे आठ प्रभाग असतील तर पी पूर्वमध्ये ३६, ३७, ३८, ३९, ४०, ४१, ४२, ४३, ४४, ४५  असे दहा प्रभाग असतील.

पी उत्तर

४१.०५  चौ. किमी.  क्षेत्रफळ

९,५९, ५९५ लोकसंख्या