राज्यामधील सत्तासंघर्ष आणि अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाने मंगळवारी ‘ढाल-तलवार’ (एक ढाल, दोन तलवारी) चिन्ह दिले. पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार उभा केल्यास शिंदे गटाला नव्या चिन्हाचा वापर करता येईल, असे आयोगाने आदेशपत्रात स्पष्ट केले. हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेसहीत शिंदे गटातील नेत्यांनी समाधान व्यक्त करताना हे चिन्ह छत्रपती शिवाजी महाराजांचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाकडून या चिन्हासंदर्भात बोलताना तलवार ही गद्दारीची असून ढाल भारतीय जनता पार्टीची असल्याचा टोला लगावण्यात आला आहे. मात्र शिंदे गटाला दिलेल्या चिन्हावरुन झालेल्या या टीकेवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे.

नक्की वाचा >> “नेहरूंना कश्मीर प्रश्न सोडविता आला नाही हे मान्य, पण मोदी…”; ठाकरे गटाचा हल्लाबोल, स्वत:च्या जातीचा उल्लेख केल्यावरुनही पंतप्रधानांना टोला

बुधवारी मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांना ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या निवडणूक चिन्हाबाबत होणाऱ्या टीकेचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला. शिंदे गटाला मिळालेल्या चिन्हावरुन ठाकरे गटाकडून भाजपाची ढाल आणि गद्दारांची तलवार अशी टीका केली जात आहे, असं म्हणत फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत ठाकरे गटाला लक्ष्य केलं.

rajendra gavit lok sabha, palghar lok sabha marathi news
उमेदवारी नाकारली तरीही खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपमध्ये प्रवेश; भविष्यात आमदारकी ?
Mahadev Jankar
“भावी मंत्री म्हणून बोलतोय, निवडणुकीच्या निकालानंतर मी…”, महादेव जानकरांचं बारामतीकरांसमोर वक्तव्य
Sharad pawar on Udyanraje bhosale lok sabha election
“राजेंबद्दल आम्ही प्रजा…”, उदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांची प्रतिक्रिया, भाजपाला टोला
kiran kher in loksabha election
भाजपाने किरण खेर यांचे तिकीट कापण्यामागे नेमके कारण काय?

नक्की वाचा >> Thackeray vs Shinde: रागावू नका पण अडीच वर्ष का लागली? सत्तांतरणासंदर्भातील नाना पाटेकरांच्या प्रश्नावर शिंदे म्हणाले, “आम्ही जर…”

“असं आहे की ढाल-तलवार हे तर मराठ्यांचं मराठमोळं चिन्ह आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं, स्वराज्याचं प्रतिक असलेली ही ढाल आणि तलवार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चिन्हाला गद्दारांचं म्हणणं याहून मोठी गद्दारीच असू शकत नाही,” असा टोला फडणवीस यांनी लगावला. याचप्रमाणे फडणवीस यांनी ऋतुजा लटके यांचा राजीनामा नियमांप्रमाणे स्वीकारला जाईल. तो स्वीकारण्यासंदर्भात किंवा न स्वीकारण्यासंदर्भात पालिका आयुक्तांवर सरकारचा कोणताही दबाव नसल्याचं सांगितलं.

नक्की वाचा >> दीड वर्षांपूर्वीच ठाकरे कुटुंबाला लागलेली शिंदेंच्या बंडाची चाहूल? आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, “आमच्या घरात…”

निवडणूक चिन्हासाठी शिंदे गटाने ‘तळपता सूर्य’, ‘ढाल-तलवार’ आणि ‘पिंपळाचे झाड’ असे तीन पर्याय आयोगाला सादर केले होते. हे तीनही पर्याय खुल्या यादीतील नव्हते. शिवाय, ‘तळपता सूर्य’ हे चिन्ह मिझोराममधील ‘झोराम राष्ट्रीय पक्षा’ला देण्यात आले आहे. शिंदे आणि ठाकरे गटाने ‘उगवता सूर्या’चा पर्याय दिला होता. पण, हे चिन्ह तमिळनाडूतील ‘द्रमुक’ पक्षाला देण्यात आले आहे. त्यामुळे ‘सूर्य’ हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात आलेले नाही. शिंदे गटाच्या वतीने ‘ढाल-तलवार’ हाही पर्याय देण्यात आला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने या पर्यायाला मान्यता दिली.

नक्की वाचा >> “…त्या दिवशी मला फार दु:ख झालं”; उद्धव ठाकरेंसंदर्भातील ‘तो’ प्रसंग सांगत सुधीर मुनगंटीवार यांचं विधान

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला सोमवारी ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले होते. याआधी शिंदे गटाने ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘गदा’ ही तीन पर्यायी चिन्हे आयोगाकडे सादर केली होती. ‘उगवता सूर्य’ हे चिन्ह खुल्या यादीत नव्हते, ‘त्रिशूळ’ आणि ‘गदा’ या चिन्हांना धार्मिक संदर्भ होता. शिवाय, ‘त्रिशूळ’ या चिन्हाचा पर्याय ठाकरे गटानेही दिला होता. त्यामुळे शिंदे गटाने दिलेले तीनही पर्याय आयोगाने फेटाळले आणि मंगळवारी नवे तीन पर्याय देण्यास सांगितले होते. त्यानुसार, दिलेल्या चिन्हांमधून आयोगाने शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्हाचे वाटप केले आहे. आयोगाने ठाकरे गटाला ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ व शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या नव्या पक्षनावांचे वाटप केले आहे.