मुंबईः धुळवडीला रंग लावण्यासाठी अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला घराबाहेर खेचून तिचा विनयभंग करणाऱ्या ३५ वर्षीय आरोपीला दिंडोशी पोलिसांनी अटक केली. त्याला विरोध केला असता आरोपीने पीडित मुलगी व तिच्या आईला मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मालाड येथे १६ वर्षांच्या मुलीला रंग लावण्यासाठी ३५ वर्षीय आरोपी पीडित मुलीला घराबाहेर खेचू लागला. त्याला नकार दिला असता आरोपी संतापला त्याने पीडित मुलीला मारहाण करून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईलाही मारहाण केली. पीडित मुलीचे वडील व काकांनीही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांनाही शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर पीडित मुलीने याप्रकरणी तक्रार केल्यानंतर दिंडोशी पोलिसांनी विनयभंग, मारहाण व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dindoshi police arrested the molesting accused mumbai print news amy
First published on: 26-03-2024 at 23:05 IST