लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो १ मधील प्रवाशांना आता आपल्या मेट्रो १ सेवेबाबतच्या कोणत्याही तक्रारी व्हाट्सऍपवर नोंदविता येणार आहेत. ९९३०३१०९०० या व्हाट्सऍप क्रमांकावर प्रवाशांना आपली तक्रार नोंदविता येणार आहे.

या तक्रारीचे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून (एमएमओपीएल) ७२ तासांच्या आत निवारण केले जाणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर एमएमओपीएलकडून या सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे.

हेही वाचा… अखेर औषध वितरकांच्या खात्यामध्ये महानगरपालिका करणार देयकांची रक्कम जमा; औषध वितरकांच्या इशाऱ्यानंतर आयुक्तांचे आदेश

मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्न एमएमओपीएलचा आहे. त्यानुसार प्रत्येक मेट्रो स्थानकांवर ग्राहक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोशल मीडिया आणि ई मेलच्या माध्यमातून प्रवाशांचे प्रश्न, समस्या आणि तक्रारी जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न एमएमओपीएलकडून केला जात आहे. आता यापुढे सोमवारपासून एमएमओपीएलने व्हाट्सऍपवरही तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai mmopl starts new service from maharashtra day to register a complaint regarding metro 1 on whatsapp mumbai print news dvr
Show comments