मुंबई : जान्हवी कुकरेजा खून प्रकरणात कूपर रुग्णालयातील न्यायवैद्यक पथकाच्या मदतीने पोलिसांनी शनिवारी गुन्ह्य़ाचा घटनाक्रम (क्राईम सीन) तयार केला. यावेळी दिया आणि श्री याला पोलिसांनी घटनास्थळी आणले होते. आरोपी दिया पडळकर, श्री जोगधनकर यांनी दिलेले जबाब, त्याचबरोबर घटना घडली त्या रात्री पार्टीत सहभागी झालेल्या इतर १२ जणांच्या जबाबतून पोलिसांनी हा घटनाक्रम साकारला.

लोकसभा निवडणूक २०१९ निकाल

जान्हवी, दिया आणि श्री हे तिघे पार्टीत सहभागी झाल्यानंतर त्यांच्यात नेमके काय घडले, इमारतीच्या पायऱ्यांवर असताना या तिघांच्यात काय झाले, याचा नेमका घटनाक्रम पोलिसांना यातून जुळवता येईल. तसेच घटनेच्या रात्री अर्धा तास दिया आणि श्री नक्की कोठे होते याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणातील आरोपी श्री जोगधनकर याच्यावर रुग्णालयातील उपचार पूर्ण झाले असून पोलिसांना त्याचा ताबा मिळाला आहे. त्यामुळे त्याचीही पोलिसांना कसून चौकशी करता येणार आहे.

नववर्ष स्वागतासाठी खार येथील भगवती हाईट्स येथे आयोजित पार्टीत जान्हवी या १९ वर्षीय तरूणीची हत्या करण्यात आली. यातील दिया ही जान्हवीची बालपणीची मैत्रीण आहे.