‘सावरखेडा एक्सप्रेस’ म्हणून प्रसिद्ध असणारी कविता राऊतने मागील वर्षी ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारावर आपले नाव कोरले होते. शालेय शिक्षणासारख्या मूलभूत सुविधेसाठीही जाऊन-येऊन २० किलोमीटर पायपीट करावी लागे, असे कविता राऊतने एका मुलाखतीत सांगितले. पायांना लहानपणापासूनच अशी सवय आणि सराव मिळाल्यामुळे कविता जागतिक दर्जाची दीर्घ पल्ल्याची धावपटू झाली. तुम्हीही यंदाच्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारासाठी अर्ज करु शकता. कसा कुठे कधी जाणून घ्या येथे क्लिक करुन

नक्की वाचा >> पहिल्या पर्वातील विविध क्षेत्रांमधील १२ लखलखते हिरे

prasad oak shared his first national award memories
“राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पण, दुसरीकडे माझं घर विकलं”, प्रसाद ओकने पहिल्यांदाच केला खुलासा; म्हणाला, “बँकेचे हप्ते, कर्ज…”
90s filmfare award show viral video
90’s चे सिनेस्टार! नव्वदच्या दशकातील फिल्मफेअर पुरस्काराचा VIDEO व्हायरल, नेटकरी म्हणाले, “हा बॉलीवूडचा सुवर्णकाळ..”
मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार

वाचा >> ‘तरुण तेजांकित’ला भरभरून प्रतिसादाची झळाळी

साहित्य, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, प्रशासन अशा अनेक क्षेत्रांत तरुण पाय रोवून काम करत आहेत. विचारांना कृतीची जोड देत परिस्थिती बदलू पाहात आहेत. नवे मानदंड निर्माण करत आहेत. त्यांच्या परिश्रमाचे, प्रज्ञेचे कौतुक ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या उपक्रमातून करण्यात येते. गेल्या वर्षी या उपक्रमांतर्गत १२ तरुण प्रज्ञावंतांचा गौरव करण्यात आला.

यंदाच्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वालाही भरभरून प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील प्रज्ञावंतांच्या आग्रहास्तव नावनोंदणीला १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

नावनोंदणीसाठी.. : लखलखत्या हिऱ्यांचे यंदाचे शोधपर्व सुरू झाले आहे. त्यासाठी तरुणांनी  http://taruntejankit.loksatta.com/methodology/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्जात माहिती भरून नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इतरांनाही आपल्या भवताली दिसणाऱ्या गुणवंत तरुणांची नावे माहितीसह सुचवता येईल.