मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी घेत असलेल्या मुंबईतील विशेष न्यायालयाने भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना वैद्यकीय कारणास्तव जबाब नोंदविण्यासाठी व्यक्तिशः उपस्थित राहण्याची सूट दिली आहे. मात्र याचबरोबर न्यायालयाने २५ एप्रिल रोजी न्यायलायत उपस्थित न झाल्यास आवश्यक तो आदेश दिला जाईल, असेही सांगितले आहे. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या एका मशिदीबाहेर बॉम्बस्फोट झाला होता. यात सहा लोकांचा मृत्यू तर १०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकरण काय आहे?

शनिवारी (दि. २० एप्रिल) विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना प्रज्ञा ठाकूर यांनी वकिलाच्या मार्फत अनुपस्थित राहण्याबाबत याचिका दाखल केली. भोपाल येथे उपचार सुरू असल्यामुळे अनुपस्थित राहण्याची मागणी मान्य व्हावी, असे याचिकेत म्हटले. त्याआधी ८ एप्रिल रोजी न्यायालयाने २० एप्रिलला न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेने प्रज्ञा ठाकूर यांच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून न्यायालयाला दिलेल्या अहवालानुसार न्यायालयाने २० एप्रिलला उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र आता वकिलांच्या ताज्या याचिकेनंतर २५ एप्रिल ही शेवटची मुदत देण्यात आली आहे.

“मोदींची जागा घेण्याचे फडणवीसांचे स्वप्न, म्हणूनच त्यांचा…”, संजय राऊतांची खोचक टीका

राष्ट्रीय तपास यंत्रणेने सांगितले की, प्रज्ञा ठाकूर यांच्या वतीने जे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल करण्यात आले, त्यानुसार त्या भोपाळ ते मुंबई प्रवास करू शकत नाहीत, याबाबत कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी आपल्या आदेशात म्हटले, “प्रज्ञा ठाकूर यांच्या वकिलांनी सादर केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार त्यांना शेवटची संधी दिली जावी, या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहोत. आरोपी क्र. १ (प्रज्ञा ठाकूर) यांना २५ एप्रिलच्या आधी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देत आहोत. जर त्या उपस्थित राहिल्या नाहीत, तर आम्ही आवश्यक ती कारवाई करू.”

“दाढी वाढवली म्हणजे, कोणी दिघे साहेब होत नाही”, ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांची टीका

मागच्या महिन्यात न्यायालयाने प्रज्ञा ठाकूर यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट काढले होते. मात्र ठाकूर यांच्या वकिलांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिल्यानंतर वॉरंट स्थगित करण्यात आले. ठाकूर भोपाळहून मुंबईच्या दिशेने निघाल्या होत्या. मात्र रस्त्यातच प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malegaon 2008 blast case court allows exemption to pragya thakur as a last chance kvg
Show comments