२१ ते २४ जुलै दरम्यान पणजी येथे आयोजन; काव्यहोत्र सन्मान व काव्यहोत्र पदार्पण पुरस्कार

Djokovic recipient of the Bonmati Laureate Award sport news
जोकोविच, बोनमती लॉरेओ पुरस्काराचे मानकरी
मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!

कला अकादमी-गोवातर्फे येत्या २१ ते २४ जुलै या कालावधीत पणजी येथील अकादमीच्या संकुलात ‘काव्य होत्र’ या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गोवा राज्य शासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यातक आलेल्या या काव्यसंमेलनात विविध भाषेतील कवी सहभागी होणार आहेत. वैशिष्ठय़ म्हणजे हे कवीसंमेलन सलग ७४ तास चालणार आहे.

काव्यहोत्रचे उद्घाटन गोवा राज्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते होणार असून २१ जुलै रोजी दुपारी बारा वाजता सुरु झालेल्या काव्यहोत्रचा समारोप २४ जुलै रोजी दुपारी बारा वाजता होणार आहे. यंदापासून काव्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेल्या कोणत्याही भाषिक एका कवीला ‘काव्यहोत्र सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. दोन लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच देशातील कोणत्याही भाषेतील दोन कवींना ‘काव्यहोत्र पदार्पण’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून याचे स्वरुप प्रत्येकी २५ हजार रुपये व मानपत्र असे आहे. पुरस्कारप्राप्त कवींची निवड कला अकादमीतर्फे केली जाणार आहे. काव्यहोत्रच्या समारोपाच्या दिवशी पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

काव्यहोत्र कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातील विविध भाषेतील कवींनी आपली माहिती येत्या १६ जुलैपर्यंत पाठवावी. विहित नमुन्यातील अर्ज www.Goacom.com /kavyahotra या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. काव्यहोत्रबाबतची माहिती येथे मिळू शकेल. अकादमीकडे आलेल्या अर्जातून कवींची निवड केली जाणार आहे. काव्यहोत्र कार्यक्रमात वेगवेगळ्या भाषेतील कवींचे गटवार प्रस्तुतीकरण होणार असून किमान सहा कवींचा सहभाग असलेल गटास कविता सादरीकरणासाठी एक तासाचा कालावधी देण्यात येणार आहे. सहभागी कवींनी स्वरचित कविता सादर करणे आवश्यक आहे. तसेच अन्य नामवंत कवींच्या कवितांचे वेगळ्या प्रकारे सादरीकरण करायचे असेल तर त्यासाठी अकादमीकडे वेगळा प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन अकादमीने केले आहे.