मुंबई: ‘एकमेकांचे राजकीय विचार वेगवेगळे असू शकतात. राजकीय पक्षांत मतभिन्नता असू शकते. विधिमंडळात यावर चर्चा होऊ शकते. मात्र विधिमंडळाच्या बाहेर सत्ताधारी आणि विरोधक हे सारे विसरून एकमेकांसोबत चहा घेत असत. ही महाराष्ट्राची पंरपरा आहे. मात्र अलीकडील काळात यामध्ये फरक पडला आहे. महाराष्ट्राचे विधिमंडळ फार अडचणीच्या काळातून वाटचाल करीत असून, विधिमंडळाचा दुरुपयोग होत आहे, अशी खंत शिवसेना उद्धव बाळासाहेत ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या विधान परिषदेतील भाषणांच्या ‘अभिनंदन.. अभिवादन’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात जाधव बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी उपस्थित होते.

विधिमंडळाचा वापर वैयक्तिक अडचणी मांडण्यासाठी करायचा नसतो. तर राज्यातील जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचा असतो. विधिमंडळाचे काम नियमाला धरून होत नाही. कोणीही उठते आणि मनाला येईल तसे वागते. एखादा मंत्री सभागृहात येतो. तात्काळ घोषणा करतो. लगेच चौकशी लावली जाते. अशाप्रकारे दुरुपयोग केला जात आहे, असेही जाधव म्हणाले. आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून हे पुस्तक तयार करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ruling party misuse legislative assembly in maharashtra says bhaskar jadhav zws
Show comments