राज्यात दसरा मेळाव्यावरून राजकारण रंगले आहे. त्यात कल्याणमध्ये आणखी एक नवीन वादाची ठिणगी पडली आहे. कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सव कोण साजरा करणार यावरुन दोन्ही गटांनी नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कोणाला परवानगी देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार असून, नवरात्री अगोदर राजकीय गरबा कल्याणात रंगू लागला आहे.

1968 साली कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर पूजा-अर्चना करण्यासाठी बंदीहुकुम जारी करण्यात आले होते. यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सपत्नीक बंदीहुकुम मोडून देवीची पूजा केली. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. शिवसेनेच्या नियमाप्रमाणे किल्ले दुर्गाडी देवीच्या नवरात्र उत्सवाचा अध्यक्ष हा शहर प्रमुख असतो. मात्र, यंदा या उत्सवावर देखील शिंदे गट विरुद्ध शिवसेना हे वादाचं सावट आहे.

Why has the government banned 23 dangerous dogs in the country
पिटबुल, रोटवायलर, अमेरिकन बुलडॉग… देशात २३ ‘धोकादायक’ श्वानांवर सरकारकडून बंदी का? श्वानप्रेमींचे बंदीविरुद्ध आक्षेप कोणते?
rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
Statue, Shivaji Maharaj, Assam,
आसाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, चीनच्या सीमेवर २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये अनावरण, साताऱ्यातील सुपुत्राचा पुढाकार
chhatrapati sambhajinagar, Chandrakant Khaire, Imtiaz Jaleel, Eid, lok sabha election 2024
औरंगाबादमध्ये मुस्लीमबहुल भागातही शिवसेनेचा राबता वाढला, खैरे आणि इम्तियाज जलील यांची गळाभेट

शिवसेना शहर प्रमुख सचिन बासरे यांच्यासह शिंदे गटातील शहर प्रमुख व विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे नवरात्र उत्सव साजरा करत पूजेचा मान देण्याची परवानगी मागितली आहे. दोन्ही बाजूंनी परवानगी आम्हालाच मिळणार, असा दावा केला जातो. त्यामुळे ही परवानगी कोणाला द्यावी यावर अद्याप जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची सुनावणी केली नाही. मात्र, जिल्हाधिकारी कोणाला परवानगी देणार? बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा कोण पुढे सुरू ठेवणार? देवीची कृपा कोणावर होणार हे पाहवं लागणार आहे.