मुंबई : ‘वर्सोवा – अंधेरी – घाटकोपर मेट्रो १’ सेवा गुरुवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली. तांत्रिक बिघाडामुळे सकाळी ९.३० पासून ‘मेट्रो १’ मार्गिकेवरील गाड्या १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहेत.

तर सर्व मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.सर्व स्थानकांवर तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो विलंबाने धावत असल्याची घोषणा केली जात आहे.

हेही वाचा…खडकी दारूगोळा कारखान्याच्या प्रतिबंधित परिसरातील बेकायदा इमारतींचे सर्वेक्षण करा – उच्च न्यायालय

याविषयी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडला (एमएमओपीएल) विचारले असता तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो १ मार्गिकेवरील गाड्या विलंबाने धावत असल्याचे सांगितले. लवकरच दुरुस्तीचे काम पूर्ण होईल आणि ‘मेट्रो १’ सेवा सुरळीत होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.