अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर भाजपाचे निरंजन डावखरे यांनी बाजी मारली. डावखरे यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संजय मोरे यांचा २९८८ मतांनी पराभव केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करून डावखरेंनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपात प्रवेश करतेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डावखरेंच्या उमेदवारीची घोषणा केली होती. ऐनवेळी पक्षात आलेल्या डावखरेंना उमेदवारी देण्यात आल्याने पक्षाच्या निष्ठावंतांमध्ये थोडीसी नाराजी दिसून आली होती. पण भाजपाच्या निकालावर याचा परिणाम झाला नाही. राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. कोणत्याही परिस्थितीत डावखरेंचा पराभव करण्याचा विडा राष्ट्रवादीने उचलला होता. परंतु, त्यांना यश आले नाही. राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

अपेक्षेप्रमाणे यश मिळाले. सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. दररोज डावखरेसाहेबांची आठवण येते, अशी प्रतिक्रिया निरंजन डावखरेंनी विजयानंतर माध्यमांना दिली. मतमोजणीच्या सुरूवातीला संजय मोरे हे २००० पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर होते. मात्र, तिन्ही उमेदवारांमध्ये मतांचे अंतर खूप कमी होते. पहिल्या फेरीत डावखरे हे आघाडीवर राहिले. पहिल्या फेरीत डाखरेंना १०,३०४ मोरेंना ९,४९४ मते मिळाली होती. तर दुसऱ्या फेरीनंतर डावखरे यांना ११,१८० आणि मोरे यांना ८,९९७ मते मिळाली होती.

Sharad Pawar, Sharad Pawar predicts NCP Madha Satara win, Madha lok sabha seat, satara lok sabha seat, marathi news, lok sabha 2024, sharad pawar ncp, marathi news, satara news, madha news, sharad pawar in satara, sharad pawar public meeting in satara,
माढा आणि साताऱ्यातून लाखाच्या मताधिक्याने जिंकू, शरद पवार यांचा दावा
Leaders of Mahavikas Aghadi ignore Yavatmal-Washim
महाविकास आघाडीच्या नेत्यांची यवतमाळ-वाशिमकडे पाठ?
Rashtriya Janata Dal Lalu Prasad Yadav Muslim-Yadav Loksabha Election 2024 RJD Bihar List
मुस्लीम-यादवांच्या पलीकडे जाण्याचा लालूंच्या पक्षाचा प्रयत्न; राष्ट्रीय जनता दलाने कुणाला दिली उमेदवारी?
Raj thackeray, Mahayuti, MNS,
मनसेच्या पाठिंब्याने महायुतीचा फायदा किती ?

तिसऱ्या फेरीत डावखरेंनी निर्णायक आघाडी घेतली. या फेरीत त्यांना २८,९४५ तर मोरेंना २३,२११ मते मिळाली. या फेरीत डावखरे हे ५,७३४ मतांनी आघाडीवर होते. मात्र कोटा पूर्ण करण्यासाठी अपेक्षित असलेली मते न मिळाल्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. या निवडणुकीत सुमारे अडीच हजाराहून अधिक मते अवैध ठरली. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ७३.८९ टक्के इतके मतदान झाले होते.