नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी आलेला धमकीचा फोन हा दिल्लीतून आला असून, तो सूरजकुमार नावाच्या व्यक्तीने केल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सुगावा लावून धमकी देणाऱ्याला तातडीने अटक करण्यासाठी वेगवान पावले उचचली आहेत. दरम्यान, या धमकीनंतर गृहमंत्र्यांच्या सिव्हिल लाईन्समधील जीपीओ चौकातील निवासस्थानावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवास्थानावर फोन करून ‘कंगना रनौट के प्रकरण मे मत पडो, नही तो उडा देंगे’, अशी धमकी देण्यात आली. या प्रकरणाची तक्रार पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे करण्यात आली. गृहमंत्र्यांनाच धमकीचा फोन आल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली.

पोलिसांनी हायटेक तपासाद्वारे धमकी देणाऱ्याचा शोध सुरू केला. मंगळवारी दिल्लीहून फोन आल्याचे वृत्त समोर आले.