महावितरणचा ऑनलाईन वीज देयक पर्याय निवडल्यास प्रत्येक ग्राहकाला वर्षांला १२ वीज देयकामागे एकूण १२० रुपयांची सवलत मिळणार आहे. या योजनेत ग्राहकाला छापील देयकाऐवजी ई-मेलवर किंवा एसएमएसच्या माध्यमातून देयक पाठवले जाईल. सध्या राज्यातील १ लाख ६२ हजार ३१४ ग्राहक या  पर्यायाचा लाभ घेत आहेत.

ग्राहकाला संकेतस्थळावर देयक बघण्याचा पर्याय उपलब्ध आहे. सोबतच राज्यातील ग्राहकांना छापील देयकही दिली जात आहेत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महावितरणने १ डिसेंबर २०१८ पासून ग्रो- ग्रीन सुविधेचा पर्यायही ग्राहकांना उपलब्ध केला आहे. या सुविधेमुळे छापील देयकासाठीचा वाचणारा १० रुपयांचा लाभ ग्राहकांना दिला जातो. या योजनेनुसार प्रत्येक देयकापोटी ग्राहकांना १० रुपयांची सूट मिळते. या योजनेसाठी ग्राहकांना महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे अथवा संकेतस्थळावर नोंदणी करता येते.