यवतमाळ  : वणी तालुक्यातील सुकनेगाव शिवारात असलेल्या तलावाजवळ वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला. ही घटना बुधवारी उघडकीस आली.सुकनेगाव बिटमध्ये महसूल विभागाच्या कक्ष क्रमांक ६ पासून २० ते ३० मीटर अंतरावरील तलावाजवळ वाघाचा बछडा मृतावस्थेत पडलेला होता. ही बाब वनपरीक्षेत्रीय अधिकारी प्रभाकर सोनडवले यांना कळताच त्यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. मृत बछड्याचे वय अंदाजे तीन महिने होते. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, असे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. घटनास्थळावर पंचनामा केल्यानंतर मंदर येथील निलगिरी वनात मृत बछड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वणी तालुक्यात कोळसा खाणी तसेच जंगल परिसरात वाघाचा वावर असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी वाघाने जनावरे तसेच शेतमजुरांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A tiger calf was found dead in vani taluka nrp 78 amy
First published on: 01-02-2024 at 21:01 IST