चंद्रपूर: २०२२ मध्ये देशातील नद्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर सर्वाधिक ५५ नद्या प्रदूषित आढळल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा, पैनगंगा आणि वैनगंगा, इरई, झरपट या गेल्या दहा वर्षांपासून प्रदूषित जाहीर झाल्या असून २०२३ मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार जल सेपि स्कोर ५९.३ असल्याने या सर्वाधिक प्रदुषित आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या नद्यांचे प्रदुषण कमी करण्यासाठी दहा वर्षांपूर्वी दोनदा कृती आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, कृती अंमलात आलेली नसल्याने प्रदुषणाची समस्या जैसे थे आहे.

जिल्हयातील वर्धा, पैनगंगा आणि वैनगंगा, इरई, झरपट या पाच प्रमुख नद्या आहेत. या नदीपात्रालगत उद्योगधंदे असल्यामुळे उद्योगातून येणारे केमिकलयुक्त पाणी, शहरातील सांडपाणी, घनकचरा, वेकोलीच्या कोळसा खाणी, तसेच नाली व गटारातील अस्वच्छ पाणी नद्यामध्ये येत असल्याने या नद्या पूर्णपणे प्रदुषित झाल्या आहे. मात्र, या नद्या स्वच्छ करण्यासाठी कधीही प्रयत्न झाले नाही.

हेही वाचा… वर्धा शिक्षण व्यवस्था सर्वोत्तम; डॉ. अभय बंग यांनी स्पष्ट केले कारण…

दहा वर्षांत दोनदा कृती आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रदुषणाची स्थिती जैसे थे आहे. शासनाने किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केलेला कृती आराखडा निधीअभावी व गंभीरतेने न घेतल्याने कागदावरच राहिला आहे. नद्यांच्या प्रदूषणाने जमिनीवरील भूजल मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाले असून नागरिकाना अनेक रोग राईचा सामना करावा लागत आहे. सांडपाणीयुक्त पाणी आणि इतर जल प्रदूषणाचे अनेक गंभीर परिणाम होताना दिसत आहे. जास्त गाळ आणि खनिजे असलेल्या पाण्यामुळे किडनीत आणि पित्ताशयात खडे, रसायनामुळे रक्त आणि अवयवात बिघाड, रोगजंतूमुळे कॉलरा, डायरिया, डीसेंट्री, हिपाटीसीस, टायफोईड, गेस्ट्रो, कावीळ तसेच जीवाणू, विषाणूचे आजार नागरिकांना होतात. त्यामुळे नदी प्रदुषणाच्या कृती आराखड्याची त्वरीत अमंलबजावणी करण्याची मागणी पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All five major rivers in chandrapur district polluted for ten years rsj 74 dvr