अमरावती : पाण्‍याचे बिल भरण्‍यासाठी आलेल्‍या नागरिकांसह परिसरातील विद्यार्थ्‍यांवर मधमाशांनी हल्‍ला केल्‍याने दहा ते बारा जण जखमी झाले असून एका अपंग व्‍यक्‍तीसह दोघांची प्रकृती चिंताजनक असल्‍याचे सांगण्‍यात येते. ही घटना चांदूर बाजार येथे गुरुवारी दुपारी घडली. कमलाकर आसोलकर (५०) आणि नयन उके (२५) दोघेही रा. चांदूरबाजार अशी गंभीर जखमींची नावे आहेत. त्‍यांना सुरुवातीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. कमलाकर आसोलकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

कमलाकर आसोलकर हे पाण्याचे बिल भरण्यासाठी पाणीपुरवठा कार्यालयात पोहोचले असता, कार्यालयातील पाण्याच्या टाकीवरील मधाच्या पोळ्यातून अचानक मधमाशा उडू लागल्या. कमलाकर आसोलकर हे अपंग आहेत. एका हाताला व एका पायाला पूर्ण लकवा झाला होता. कमलाकर मधमाशांनी वेढले गेले आणि बेशुद्ध पडले. पाणीपुरवठा कार्यालयातील अग्निशमन दलाच्या जवानाने आसोलकर यांच्‍यावर पाण्याचा फवारा मारला. त्‍यामुळे मधमाशा काही काळ दूर झाल्‍या, पण पाण्याची फवारणी थांबल्‍यावर पुन्हा त्यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला.

Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव
5 Crore and 45 lakh embezzlement in Nandura Urban Bank
नांदुरा अर्बन बँकेत साडेपाच कोटींचा अपहार, कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन…
survey has revealed that 15 percent of the houses in the city do not even have a sight of sparrows
१५ टक्के घरांमधून चिमण्यांचे दर्शन दुर्लभ… काय सांगतोय अकोल्यातील सर्वेक्षणाचा निष्कर्ष?
mumbai university marathi news, cdoe result marathi news
मुंबई : निकालांपासून विद्यार्थी दूरच, वर्षभरानंतरही दूरस्थ; ऑनलाइन शिक्षण केंद्राचे विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत

हेही वाचा – शेतकऱ्यांना हमीभाव नाही अन् गद्दारांना ५० खोक्यांचा भाव, उद्धव ठाकरेंचा घणाघात

हेही वाचा – नक्षलवाद्यांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, शत्रूसारखी वागणूक देणाऱ्या सरकारला धडा शिकवा; पत्रकाद्वारे आवाहन

कमलाकर असोलकर यांना रुग्णवाहिकेच्या सहाय्याने तहसील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने कमलाकर यांना अमरावतीच्‍या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्‍या नयनवर उपचार सुरू आहेत. इतर जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात येईल. त्यानंतर शहरातील अनेक चौकाचौकात मधमाशांचे थवे घिरट्या घालताना दिसल्याने शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या बारावीच्या परीक्षाही सुरू आहेत. आर. आर. काबरा शाळेतील काही विद्यार्थ्यांवरही मधमाशांनी हल्‍ला केला. परीक्षा केंद्राच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद करून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्‍यामुळे अनर्थ टळला.