प्रबोध देशपांडे, लोकसत्ता

अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यावरून भाजपपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. पोटनिवडणूक लढण्यासाठी पक्षात इच्छुकांची प्रचंड गर्दी असून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत. ‘अकोला पश्चिम’मध्ये उमेदवार देतांना भाजपला लोकसभा निवडणुकीचा देखील पुरेपूर विचार करावा लागणार आहे. दोन्ही निवडणुकांचे समीकरण जुळवण्याच्या दृष्टीनेच भाजप उमेदवार देण्याची शक्यता आहे.

all Parties Strategize Independently contest elections, Joint Battle, allied parties, Kolhapur Assembly Elections, Maharashtra assembly election 2024, Parties Strategize Independently contest elections in Kolhapur,
कोल्हापूरमध्ये सर्वच पक्षांची स्वबळाची तयारी
Wardha, Legislative Assembly,
वर्धा : तळ्यात मळ्यात ! विधानसभेसाठी दोन तगड्या उमेदवारांची राजकीय पक्ष की अपक्ष अशी दुविधा
vanchit bahujan aghadi marathi news
वंचितचा विधानसभेसाठी नव्याने डाव…महाविकास आघाडीसोबत आता चर्चेची दारे…
Dhananjay Mahadik appeals to BJP workers to prepare for Legislative Assembly without getting involved in analysis of Lok Sabha elections
लोकसभा निवडणुकीच्या विश्लेषणात न गुंतता विधानसभेच्या तयारीला लागावे, धनंजय महाडिक यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
Loksatta samorchya bakavarun opposition party Employment Congress Manifesto
समोरच्या बाकावरुन : आता सगळी मदार विरोधकांवर!
Ajit pawar Mahayuti
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेआधी महायुती-मविआची परिक्षा; अजित पवारांच्या अडचणीत मात्र वाढ
pasmanda muslim bjp uttar pradesh
भाजपाला पसमांदा मुस्लिमांची मतं का मिळाली नाहीत?
maharashtra assembly elections 2024, Jayant Patil, Vishwajeet Kadam, sangli, Jayant Patil and Vishwajeet Kadam compete for supremacy in sangli, congress, sharad pawar ncp, maha vikas aghadi,
सांगलीवरील वर्चस्वासाठी जयंत पाटील, विश्वजित कदमांमध्ये स्पर्धा

देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसोबतच रिक्त असलेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर झाला. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात तब्बल २९ वर्षे भाजपचा झेंडा फडकावणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार गोवर्धन शर्मा यांचे ३ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. आता निवडणूक आयोगाने लोकसभेसोबतच अकोला पश्चिमच्या पोटनिवडणुकीवर शिक्कामोर्तब केले. दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी तळागाळात पक्ष संघटनेची मजबूत बांधणी करून अकोल्यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. सलग सहा निवडणुकांमध्ये विजयश्री खेचून आणणाऱ्या गोवर्धन शर्मा यांच्या पश्चात गड कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान आहे. मतदारसंघात सर्वधर्मीय मतदारांची संख्या मोठी आहे. गोवर्धन शर्मा यांच्या तुल्यबळ नेता भाजपला आता मिळणे शक्य नाही. तरी त्यांचे उत्तराधिकारी कोण होतो, याकडे राजकीय वर्तुळाले लक्ष लागले आहे.

आणखी वाचा- ‘लुटेरी दुल्हन!’ ट्रॅव्हल्स व्यापाऱ्याशी बळजबरी लग्न, १७ लाख उकळले

लोकसभा निवडणुकीत खासदार संजय धोत्रे प्रकृती अस्वस्थामुळे सक्रिय राजकारणापासून दूर असल्याने भाजपने त्यांचे पूत्र अनुप धोत्रे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले. त्यावर विरोधकांकडून घराणेशाहीची टीका होत आहे. आता भाजप ‘अकोला पश्चिम’मध्ये कुणाला रिंगणात उतरवते, यावर बरेच गणित अवलंबून राहतील. या अगोदर पुण्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा अनुभव लक्षात घेता भाजप नेतृत्व शर्मा कुटूंबात उमेदवारी देणार की इतरांना संधी देणार, हा कळीचा मुद्दा ठरू शकतो. स्व.गोवर्धन शर्मा यांचे पूत्र कृष्णा शर्मा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. याशिवाय विजय अग्रवाल, ॲड. मोतीसिंह मोहता, हरीश आलिमचंदानी, डॉ. अशोक आळंबे, गिरीश जोशी, सिद्धार्थ शर्मा, डॉ. साहू यांच्यासह १५ च्यावर उमेदवार निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. भाजपच्या पक्षनिरीक्षकांनी शहरात दाखल होत इच्छुकांसह पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील दोन्ही निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. ‘अकोला पश्चिम’ची उमेदवारी देतांना भाजपकडून सारासार विचार केला जात आहे. त्यामध्ये जातीय समीकरण देखील महत्त्वपूर्ण ठरेल. अकोला लोकसभेसह अकोला पश्चिमचा गड कायम राखण्यासाठी भाजपची धडपड सुरू असल्याचे चित्र आहे.

आणखी वाचा-कोट्यवधींची उलाढाल! ‘आयपीएल’साठी क्रिकेट सट्टेबाज सक्रिय

उमेदवारीवरून भाजपची दुहेरी कोंडी

‘अकोला पश्चिम’च्या जागेवरून भाजपची दुहेरी कोंडी होतांना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार संजय धोत्रे यांचे पूत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिल्यावरून भाजपला टीकेचा सामना कराव लागला. आता पोटनिवडणुकीत सुद्धा शर्मा कुटुंबात उमेदवारी गेल्यावर परिवारवादाचा ठपका भाजपवर बसेल. अन्य उमेदवार निवडणूक उतरवल्यास लोकसभेत एक, तर विधानसभेत दुसरा नियम का? असा सवाल करून पक्षांतर्गतच एक मोठा गट नाराज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भाजप आता कुठली रणनीती आखणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.