नागपूर : बार आणि रेस्टॉरन्ट, (परमीट रूम), क्लब, पब्समध्ये मद्यापानासाठी असलेल्या वयाच्या अटींवरून सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. नियमानुसार २५ वर्षे पूर्ण झालेल्या परवानाधारकांनाच बारमध्ये मद्याप्राशन करता येते. मात्र परमिटरूमधारक २५ वर्षे वयाच्या अटीचा अर्थ २४ वर्षे पूर्ण करणारा असा घेऊन त्यांना मद्या देतात असे आढळले आहे. नियमाबाबत स्पष्ट माहिती नसल्याने हा गोंधळ उडत असल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यात विकासकाच्या अल्पवयीन मुलाने मद्याधुंद अवस्थेत कार चालवून दोघांचा बळी घेतल्यानंतर या मुलाला पबमध्ये मद्या कसे देण्यात आले हा प्रश्न कळीचा बनला आहे. या घटनेनंतर राज्यभरातील सर्व परमिट रूम आणि पब्सच्या परवान्यांची तपासणी सरकारने सुरू केली आहे. मात्र मद्यापानाच्या अटींबाबत नेमके नियम काय आहेत याची पुरेशी माहिती अधिकारी, तसेच बार वा पब मालकांनाही नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘मुंबई विदेशी मद्या नियम १९५३’नुसार वयाची २५ वर्षे पूर्ण झालेल्या आणि मद्या पिण्याचा परवाना असणाऱ्यांनाच परमिट रूम, क्लब, पब्समध्ये मद्या पिण्याची किंवा बारमालकांनी अशा ग्राहकांनाच मद्या देण्याची मुभा आहे. दुकानातून (वाईन शॉप)मद्या खरेदी करायचे असेल तर वयाची २१ वर्षे पूर्ण करणे आणि मद्याप्राशन करण्याचा आणि बाळगण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.

हेही वाचा…लोकसभेच्या निकालापूर्वीच विधानसभेसाठी सर्वेक्षण? खासगी कंपन्या सक्रिय

संभ्रम काय?

● परमिट रूम, क्लब, पब्समध्ये वयाच्या अटीचा सूचना फलक दर्शनी भागात लावला जातो, मात्र त्याचे पालन होत नाही.
● वयाचे २५वे वर्ष सुरू असलेला की २५ वर्षे पूर्ण केलेला असा बारमालक आणि अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम.
● नियमानुसार २५ वर्षे पूर्ण म्हणजे २६व्या वर्षात पदार्पण केलेला. मात्र परमिट रुममध्ये २५ वर्षांचा म्हणजे २४ वर्षे पूर्ण केलेला असे समजून मद्या दिले जाते.
● पब्ज, बारमध्ये येणाऱ्यांकडे मद्यापानाचा परवाना आहे की नाही, याची खातरजमाही करण्यात येत नाही

हेही वाचा…‘विको’चे अध्यक्ष यशवंत पेंढरकर यांचे निधन

मद्या विक्रीसाठी २१,पिण्यासाठी २५

मद्याविक्री आणि मद्यापानाचे वय याबाबत उत्पादन शुल्क खात्याचे वेगवेगळे नियम आहे. मद्याविक्री परवान्यासाठी अर्जदाराचे वय २१ वर्षे पूर्ण हवे. मात्र मद्याप्राशन करण्यासाठी परवाना हवा असेल तर वयाची २५ वर्षे पूर्ण असणे आवश्यक. मद्याविक्रेत्याचे वय २१ वर्षे पूर्ण असेल तर त्याला मद्याप्राशन करण्यासाठी वयाची पंचवीशी पूर्ण करणे गरजेचे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion over legal drinking age in bars and pubs raises concerns following pune incident cwb 76 psg
Show comments