चंद्रशेखर बावनकु ळे यांचा आरोप

नागपूर :  राज्य सरकार  रेमडेसिविर इंजेक्शन वाटपात भेदभाव करीत असल्याचा आरोप, भाजपचे नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकु ळे  यांनी  के ला आहे. त्यांनी सोमवारी इंजेक्शन वाटपासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणेही दिले. त्यानंतर त्यांनी एक व्हीडीओ जारी के ला. त्यात के लेल्या निवेदनानुसार राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्री  करोना औषधांचा साठा आपल्या भागात अधिक वळवतात, काही जिल्ह्यांना अधिक तर काही जिल्ह्यांना  काहीच  नाही, असे भेदभावपूर्ण वाटप सध्या राज्य सरकारकडून के ले जात आहे. नागपूरमध्ये तर तीन रुग्णांमागे एक इंजेक्शन दिले जाते, आता तर दोन दिवसांपासून पुरवठाच जिल्हाधिकारी कार्यालयाने बंद के ला आहे.

उच्च न्यायालयाने यासंदर्भात दखल घेऊन पुरेसा साठा उपलब्ध  करून देण्याचे निर्देश  दिल्याने दिलासा  मिळणार आहे.  बावनकु ळे यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणाच कोलमडल्याचा आरोप केला  आहे.