Premium

डीआरआय’ची कारवाई : दुर्मीळ प्रजातीच्या कासवांची ९५५ पिल्ले ताब्यात

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने नागपूरसह देशातील, चेन्नई, भोपाळ आणि अन्य तीन शहरात छापे टाकून कासवांची ९५५ पिल्ले जप्त केली.

955 rare species tortoise puppies seized
अधिकाऱ्यांनी सहा राज्यात नागपूरसह सहा ठिकाणी छापे घालून कासवाची पिल्ले जप्त करीत तस्करांचा डाव हाणून पाडला.(फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : गंगा नदीच्या पात्रात आढळणाऱ्या दुर्मीळ प्रजातीच्या कासवांच्या पिल्लांची तस्करी करण्यात येत होती. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने नागपूरसह देशातील, चेन्नई, भोपाळ आणि अन्य तीन शहरात छापे टाकून कासवांची ९५५ पिल्ले जप्त केली. याप्रकरणी सहा तस्करांना अटक करण्यात आली.

‘डीआरआय’ने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकानुसार गंगा नदीत टेंट टर्टल, इंडियन फ्लॅपशेल टर्टल, क्राऊन रिव्हर टर्टल, काळे डाग असलेले कासव आणि तपकिरी छताचे कासव या दुर्मीळ प्राजातीच्या कासवाची पिल्ले आढळतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर या पिल्लांची तस्करी करण्यात येते. नागपूर, भोपाळ, चेन्नईसह सहा राज्यातील तस्करांनी कट आखून कासवाच्या पिल्लांची तस्करी करण्यासाठी कासवाची ९५५ पिल्ले गोळा केली होती. याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळाली.

आणखी वाचा-‘त्या’ ट्विटमुळे अजित पवार ट्रोल, “शब्दांचे पक्के असणारे दादा तिकडे गेल्यापासून…”

अधिकाऱ्यांनी सहा राज्यात नागपूरसह सहा ठिकाणी छापे घालून कासवाची पिल्ले जप्त करीत तस्करांचा डाव हाणून पाडला. याप्रकरणी सहा तस्करांना अटक करण्यात आली. आरोपींवर वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी त्यांच्या संबंधित वनविभागाकडे सोपवण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dris action 5 rare species tortoise puppies seized adk 83 mrj

First published on: 02-10-2023 at 16:14 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा