वर्धा: शिक्षणासाठी मुळीच पोषक वातावरण नसूनही दुर्गम डोंगराळ भागातून आलेल्या अजय नैताम या विद्यार्थ्याने घेतलेली भरारी कॉन्व्हेन्ट विद्यार्थ्यांसाठी पण प्रेरणा ठरावी. जिल्हा परिषद शाळेत शिकून पुढे येथील अग्निहोत्री फार्मसी मधून पदवी प्राप्त करणाऱ्या अजयची उमेद मोठी होती.पण वडील डोंगराळ भागात गुरे राखतात तर आई मजुरीची कामे करीत कसेबसे दिवस ढकलतात.मग शिक्षणासाठी पैसे येणार कुठून,हा प्रश्न पडल्यावर त्याने वर्धा आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडे मदत मागितली.पण अपुरी म्हणून त्याचे मित्र प्रफुल्ल गेडाम आदींनी सोशल मीडियावर आवाहन केले.

ते वाचून आदिवासी फेडरेशनचे डॉ.गजानन सयाम  यांनी २२ हजार रुपयाची रक्कम अजयच्या खात्यावर जमा केली.पदव्युत्तर शिक्षण घेण्यास तो सज्ज झाला. पात्रता परीक्षेची तयारी सुरू केली. राष्ट्रीय पातळीवरील जी पॉट , नायपर जेईई, सीयूइटी पीजी अश्या तीनही परीक्षा तो पहिल्याच टप्प्यात उत्तीर्ण झाला. त्याने कोलकाता नायपर  पसंत केले. कुडाच्या घरात राहणाऱ्या अजयची ही भरारी सर्वत्र अभिनंदनास पात्र ठरली. त्याला आमदार भीमराव केराम, माजी पोलीस आयुक्त बाबासाहेब कंगाले, माजी विक्रीकर उपायुक्त ज्ञानेश्वर मडावी तसेच सतीश आत्राम, प्राचार्य कोडापे, गंगाधर पूरके, सुमित्रा मसराम, संगीता सायाम, वसंत मसराम, अशोक धूर्वे, मेघा मडावी, विनोद करपते, रवींद्र उईके, विजय जुगनाके , नरेंद्र तोडासे व अन्य हितचिंतकांनी मदत केल्याचे अजयने सांगितले.आदिवासी मुलांच्या वसतिगृहात त्याचा सत्कार झाला तेव्हा गहिवरून त्याने कृतज्ञता व्यक्त केली. अजयचा आदर्श सर्वांनी ठेवावा, असे आवाहन डॉ.गजानन सयाम यांनी केले.

design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी