युरिया जिरवण्यात पाच राज्ये पुढे; निम्म्या उत्पादनाचा वापर; जमिनीच्या भविष्यातील दर्जाबाबत प्रश्न

जमिनीच्या गुणवत्तेवर परिणाम करणाऱ्या युरिया खतांचा वापर अन्नधान्य उत्पादनात अग्रेसर असलेल्या महत्त्वाच्या पाच राज्यांत निम्म्यावर आल्यामुळे भविष्यात या भागातील कृषी उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

farmer
संग्रहित छायाचित्र

महेश बोकडे

नागपूर : जमिनीच्या गुणवत्तेवर परिणाम करणाऱ्या युरिया खतांचा वापर अन्नधान्य उत्पादनात अग्रेसर असलेल्या महत्त्वाच्या पाच राज्यांत निम्म्यावर आल्यामुळे भविष्यात या भागातील कृषी उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

केंद्र सरकारच्या रसायने आणि खते मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात २०१९-२० या आर्थिक वर्षांत ३३६.९६ लाख मेट्रिक टन युरियाचा वापर झाला. हा वापर २०२०-२१ मध्ये वाढून ३५०.५१ लाख मेट्रिक टनावर गेला. २०२१-२२ मध्ये हा वापर थोडा कमी होऊन ३४१.७३ लाख मेट्रिक टन नोंदवला गेला. फेब्रुवारी आणि मार्च २०२० पासून देशात करोनाचा शिरकाव झाला. त्यानंतरही देशात पूर्वीच्या तुलनेत युरियाचा वापर वाढल्याचे माहितीच्या अधिकारात भोपाळचे सामाजिक कार्यकर्ते आशीष कोलारकर यांनी पुढे आणले आहे. त्यातच युरियाचा सर्वाधिक वापर क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात होतो. परंतु, क्षेत्रफळनिहाय लहान राज्य असलेले पंजाब यात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे धक्कादायक वास्तवही यातून समोर युरिया वापरात पाच राज्य पुढे आले आहे. २०२१-२२ या वर्षांत महाराष्ट्रातही २३.६८ लाख मेट्रिक टन रासायनिक खताचा वापर नोंदवला गेला.

 अवाजवी वापरामुळे..

शेतात रासायनिक खताच्या अवाजवी वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंची संख्या कमी होते. पालाश, कॅल्शियम, बोरॉन, तांबे या अन्नद्रव्यांची कमतरता भासते. जमिनीमध्ये अमोनिया वायू जास्त प्रमाणात तयार होऊन काही जिवाणूंच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. गांडूळांच्या संख्येवर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ उत्पादनाकडे लक्ष न देता मातीचा कस पाहणेही योग्य ठरते, असे कृषितज्ज्ञ सांगतात.

नवे काय? भारतात २०२१- २२ या वर्षांत शेतीसाठी वापरल्या गेलेल्या एकूण ३४१.७३ लाख मेट्रिक टन युरिया या रासायनिक खतापैकी निम्म्या खताचा वापर देशातील केवळ पाच राज्यांत झाला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, मध्यप्रदेश,महाराष्ट्र, राजस्थान ही ती राज्ये. 

पंजाबसारख्या लहान क्षेत्रात..

सर्वाधिक खतांचा वापर उत्तर प्रदेश या क्षेत्रफळानुसार सर्वात मोठय़ा राज्यात तर दुसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक वापरात पंजाब या लहान राज्याचा समावेश आहे. गव्हाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाबमध्ये युरिआचा असाच वापर झाल्यास तेथील जमिनीचा कस लवकरच कमी होईल.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Five states ahead urea fertilization product questions land ysh

Next Story
नागपूर : विद्यापीठ परीक्षेत गोपनियतेवर घाला ; ‘व्हॉट्सॲप’वर दिली प्रश्नपत्रिका!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी