वर्धा :  वर्धा लोकसभा मतदारसंघात आज मतदान सूरू झाले आहे. सकाळच्या पहिल्याच टप्प्यात उत्साह दिसून यवत आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जिल्हा परिषद इमारतीत असलेल्या केंद्रावर मत टाकले. या नंतर विविध केंद्राचा आढावा घेणे सूरू करणार असल्याचे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धामणगाव तालुक्यातील विटाळा गावात गौरव देविदास डाहे हा नवरदेव पहिला मानकरी ठरला. अन्य गावात त्याचे आज लग्न आहे. म्हणून नवरदेव बनूनच  तो केंद्रावर पोहचला. त्याचे संपूर्ण कुटुंब या वेळी मतदान करीत बाहेर पडले. हे सर्वात महत्वाचे कर्तव्य, त्यानंतर जीवनातील अन्य कार्य असे तो म्हणाला.

हेही वाचा >>> मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याची विक्री ! शासकीय यंत्रणा ढिम्म

स्तनदा माता साठी असलेल्या हिरकणी कक्षात पण महिला मतदार  उत्साहात पोहचल्या. त्यांच्या साठी विशेष सोय निवडणूक कार्यालयाने केली आहे. दिव्यांग मतदार पण पहिल्याच प्रहरात  येवू लागले आहे. खासदार व भाजप उमेदवार रामदास तडस हे सहकुटुंब मतदान केंद्रावर पोहचले. 

माझे मतदान झाल्यानंतर मी विविध केंद्रावर जाणार. मतदार घराबाहेर पडला पाहिजे. प्रशासनाने केंद्रावर पुरेशा सोयी केल्या असून शांततेत मतदान पार पडेल, असा विश्वास तडस यांनी व्यक्त केला. आघाडीचे अमर काळे म्हणतात की आईवडिलांच्या प्रतिमेस नमन करीत आता मतदान करण्यास निघत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Groom candidate women voters cast vote at polling station pmd 64 zws
Show comments