यवतमाळ : पांढरकवडा तालुक्यातील करंजी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्या प्रचारसभेनंतर एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भोजनावळीत उरलेले शिळे अन्न खाल्ल्याने सहा गायींचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

करंजी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्या प्रचारसभेचे आयोजन १८ एप्रिल रोजी करण्यात आले होते. यावेळी सभेसाठी आलेल्या लोकांना जेवणाची व्यवस्था इतरत्र करण्यात आली होती. आता हे जेवण एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त ठेवण्यात आल्याचे आयोजक सांगत आहेत. भोजनानंतर उरलेलले अन्न उघड्यावर फेकण्यात आले. त्यामुळे करंजी येथील सहा गायींचा अन्नातून विषबाधा होऊन मृत्यू झाला. तसेच पाच गायींना विषबाधा झाली.

हेही वाचा…“भाजपच्या सत्तेत देशात अराजकता,” काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांची घ

याबाबतची तक्रार आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात दिली असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. जनावरे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा राष्ट्रीय बजरंग दलाने केली आहे. या संदर्भात सभेचे आयोजक निमिष मानकर यांनी, सदर घटनेची माहिती पोलीस पाटील यांच्याकडून समजली असून आपण स्वतः गायींच्या मालकाची भेट घेणार असल्याचे सांगितले. ही घटना प्रचारसभेतील जेवणामुळे घडली नसल्याचे मानकर म्हणाले.

हेही वाचा…वरातीसाठी सजवलेला घोडा रात्रीच चोरांनी लांबवला, सकाळी नवरदेव….

दगावलेल्या गायीचे वासरू तीन महिन्याचे असून गाय मरण पावल्याने या वासराला कसे जगवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उघड्यावर अन्न टाकल्याने गाईचा मृत्यू झाला व ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. त्याची नुकसाभरपाई कोणाला मागावी, असा प्रश्न शेतकरी दादाराव चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.