नागपूर : राज्यात तापमानाचा आलेख वाढत चालला आहे. विदर्भात सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. तापमानाचा पारा आता ४२ अंश सेल्सिअसच्याही पलीकडे गेला आहे. तर या उन्हाळ्यात तो सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने राज्यात सहा एप्रिलपासून अवकाळीचे संकट घोंगावत असल्याची वर्दी दिली आहे. पाच एप्रिलपासूनच राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्याऐवजी त्यात वाढ होण्याचीच दाट शक्यता आहे.

हेही वाचा >>> अकोल्यातील भाजप उमेदवार अनुप धोत्रेंचे उत्पन्न किती? जाणून घ्या सविस्तर…

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian meteorological department predict unseasonal rain in maharashtra since april 6 rgc 76 zws
First published on: 04-04-2024 at 15:43 IST