Premium

हद्दच झाली… आता कंत्राटी पद्धतीने तहसीलदार पद भरणे आहे… ‘या’ जिल्ह्याने काढली जाहिरात

शासनाने बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतल्यावर आधीच तरुणांमध्ये रोष असताना आता तहसीलदार पदच कंत्राटी भरले जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

tahsildar on contract basis, tahsildar recruitment on contract basis, jalgaon collector office
कंत्राटी पद्धतीने तहसीलदार पद भरणे आहे… या जिल्ह्याने काढली जाहिरात (संग्रहित छायाचित्र)

नागपूर : जिल्हाधिकारी जळगाव, सक्षम प्राधिकारी जळगाव, उप विभागीय अधिकारी भूसावळ, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव आदी भागांमध्ये सहा महिन्यांकरीता सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची विविध पदांवर पदभरती केली जाणार आहे. याची जाहिरात समाज माध्यमांवर फिरत असून यानुसार आता सहा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने तहसीलदार पदावर भरती केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तहसीलदारासारखे महत्त्वाचे पद कंत्राटी पद्धतीने भरले जाणार असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. ही जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांनी प्रकाशित केली आहे. त्यानुसार तहसीलदार, कारकून किंवा मंडळ अधिकारी या पदांवर कंत्राटी भरती केली जाणार आहे. यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे.

हेही वाचा : केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयात नोकरी; १ लाख ५१ हजार महिना पगार, त्वरित अर्ज करा

तहसीलदार पदासाठी ४० हजार रुपये मानधन तर कारकून पदासाठी २५ हजार रुपये मानधन राहणार आहे. यासाठी शैक्षणिक अर्हता आणि विविध नियम दिले आहेत. मात्र, शासनाने बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतल्यावर आधीच तरुणांमध्ये रोष असताना आता तहसीलदार पदच कंत्राटी भरले जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jalgaon district collector office published advertisement regarding recruitment of tahsildar on contract basis dag 87 css

First published on: 29-09-2023 at 16:34 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा