प्रशांत देशमुख, लोकसत्ता

वर्धा : विशिष्ट मर्यादेतच खर्च करण्याचे बंधन निवडणूक आयोग घालून देतो. त्यातच खर्च भागविण्याची ‘कसरत’ उमेदवार कशी करतो, हे मात्र लपून नाही. एकीकडे अशी मर्यादा असतानाच प्रत्येक प्रचार साहित्याचे तसेच अन्य बाबींचे दरही ठरवून देण्यात येतात. यावेळी हे दर खूपच असल्याची कुरबूर राजकीय पक्ष तसेच उमेदवारांनी करणे सुरू केले होते. प्राप्त माहितीनुसार, हे दर कमी व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त झाली. त्याची दखल म्हणून की काय, जिल्हा निवडणूक कार्यालयाने आता सुधारित दरपत्रक जाहीर केले आहे.

vishal patil sangli congress candidate
मविआमध्ये सांगलीचा वाद चिघळणार? काँग्रेस की ठाकरे गट? उमेदवारीबाबत विशाल पाटील म्हणाले…
wardha lok sabha seat, devendra fadnavis, not attend, campaign rally , discussion started, bjp, less crowd, sharad pawar, rally, marathi news, maharashtra politics,
शरद पवारांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांच्या फसलेल्या रॅलीची गावभर चर्चा; मात्र, भाजपा नेते म्हणतात…
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?

नवे व जुने दर याप्रमाणे…

पोस्टर प्रती चौरस फूट आता २० रुपये करण्यात आले असून जुने दर २५ रुपये होते. बॅनर १० – २५, टोपी प्रती नग १५- ३०, दुपट्टा १० – ३०, फेटा ५० – ८०, होर्डिंग प्रती चौ. फु.२०- २००, बिल्ले लहान एक हजार नग, प्रती नग ३- २०, मोठे बिल्ले ५ – २८, झेंडे अर्धा फूट ८-२५, शामियाना प्रती चौ. फु. प्रती दिवस २०-१३०, कमान १२०० – २५००, हॉटेल रूम एसी २०० – ३०००, ड्राइव्हर प्रती दिवस ५००-८००, कार्यालय फर्निचर व विद्युत बिलसह प्रतिमहिना १०००-१००००, मोटर सायकल प्रतिनग पेट्रोलसह प्रतिदिन २०० – ३०० या सह विविध ८३ खर्च प्रकारचे दर नव्याने निश्चित करण्यात आले आहे.

आणखी वाचा-महिलांच्या हाती मतदान केंद्राची दोरी…

खर्चाच्या यादीत १२ बाबी नव्याने समाविष्ट करण्यात आल्या आहेत. कुलर प्रती दिवस २००, पंखा १००, मंगल कार्यालय प्रती कार्यक्रम १० हजार रुपये, लोखंडी टेबल ७०,साधा बँड २०००- ५०००, संदल ५००० – १००००, काळा पाठक ३०००- १००००, जनरेटर प्रती तास २५० – ३०००, स्टेज प्रती चौरस फूट ३० – २५०,रिक्षा १०००, रॅली विद्युत व मनुष्यबळसह १० हजार, ४०७ गाडी ४०००, एअर बलून प्रती दिवस १००, साधे फुगे १०० नग १०० रुपये, नारळ १५ व प्रतिमा प्रती चौरस फूट ७ रुपये.